आता सर्व संपलं… सुप्रिया सुळे यांची विलिनीकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजितदादांच्या पक्षांतरामुळे विलिनीकरणाचा विषय तिथेच संपला असे त्यांनी भावनिक उद्गार काढले. शरद पवार अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात, त्यामुळे सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही असे सुळेंनी स्पष्ट केले.

आता सर्व संपलं... सुप्रिया सुळे यांची विलिनीकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया
supriya sule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 11:17 PM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांना अजितदादा गटाचे नेते भेटत असल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळत आहे. पण या हवाबाजीला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. अजितदादा होते, तेव्हा विलिनीकरणावर चर्चा सुरू होती. भावाचं निधन झालं आणि हा विषयही तिथेच संपला, असं भावनिक उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. ज्या दिवशी भाऊ गेला. त्याच दिवशी विलिनीकरणाचा मुद्दा संपला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सध्या तरी विलिनीकरणाची कोणतीच चर्चा नाहीये. शरद पवार यांना सर्वच पक्षाचे लोक भेटत असतात. त्यामुळे यात काही नवीन नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...

दुसऱ्यांच्या घरात मी का?

अजितदादा गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हा अजितदादा गटातील अंतर्गत प्रश्न आहे. दुसऱ्यांच्या घरात मी का डोकावू? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

दोन दिवस घडामोडी घडल्या

अजितदादा गेल्यानंतर दोन ते तीन दिवस काही घडामोडी घडल्या होत्या. पण अजितदादांच्या निधनाने सर्वच संपलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दाच संपुष्टात आला. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही हे मी आधीही सांगितलं होतं, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्याची भेट

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. दिवाळी निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांशी या नेत्यांनी चर्चा केली असावी, असा कयास वर्तवला जात आहे. तसेच राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद हवं आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्रीपद स्वत:कडेच ठेवून घेतलं आहे. त्यामुळेही या भेटीला अधिक महत्त्व आलं होतं. पण दिवाळींच्या शुभेच्छा देण्याशिवाय मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us