AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपा मुख्यमंत्र्यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; ‘व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज’ वादावर म्हणाले

पश्चिम बंगालमधील परंपरेनुसार देवीला मासे आणि मांसाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. यावरून वादाला फोडणी मिळाली होती. आता स्वतः भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मंदिरात मासे खाल्ल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.

भाजपा मुख्यमंत्र्यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; 'व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज' वादावर म्हणाले
भाजपा मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात खाल्ले मासे; 'व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज' वादावर म्हणालेImage Credit source: video grab/Twitter
| Updated on: Sep 11, 2026 | 7:11 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘व्हेज विरुद्ध नॉन-व्हेज’ वादावरून तीव्र पडसाद उमटले होते. धर्मगुरूबागेश्वर बाबा यांनी हावडा येथील एका कार्यक्रमात बंगाली हिंदूंना एक अजब आवाहन केले होते. “दुर्गा पूजेदरम्यान बंगाली हिंदूंनी मांसाहार करणे टाळावे,” असे त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर बंगालमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावरून तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा मोठा वाद पेटला होता. तृणमूल काँग्रेसने भाजपवर ‘उत्तर भारतीय संस्कृती’ बंगालवर लादण्याचा आरोप केला होता. आता बंगालचे भाजप नेते आणि मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कोलकात्याच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन  ‘माशांचा महाप्रसाद’ ग्रहण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, भाजपने या कृतीद्वारे बंगालमधील अन्न संस्कृतीवरील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सुवेंदु अधिकारी यांनी मंदिरात काय केले?

कौशिकी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिरात खाली बसून तिथला पारंपारिक महाप्रसाद घेतला. या महाप्रसादात माशाचे डोके, फ्राईड फिश आणि बसंती पुलाव यांचा समावेश होता. अधिकारी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर करत विरोधकांना चोख उत्तर दिले. भाजपवर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी पक्षाच्या इतर नेत्यांनीही स्थानिक संस्कृतीची पाठराखण केली.

“हा आमचा पारंपारिक प्रसाद!”

या वादावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी म्हणाले, “मी एक सनातनी हिंदू आहे. महाअष्टमीला आणि कार्तिक महिन्यात मी पूर्णपणे सात्विक जेवण जेवतो. पण माँ कालीला अर्पण केलेला माशाचा भोग हा आमचा पारंपारिक आणि शतकानुशतके जुना प्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण करणे आमच्या श्रद्धेचा भाग आहे.” भाजपवर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी पक्षाच्या इतर नेत्यांनीही स्थानिक संस्कृतीची पाठराखण केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धीरेंद्र शास्त्री दुसऱ्या राज्यातून आले आहेत, बंगालच्या लोकांनी काय खावे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. बंगाली लोक मासे-मांस खाणारच.” तर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी, “सुवेंदु अधिकारी यांनी बंगालच्या परंपरेचा मान राखला असून आता हा वाद इथेच संपला पाहिजे.”

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं