
राजस्थानच्या जोधपूर येथे एक भव्य अक्षरधाम मंदिर तयार रण्यात आले आहे. 25 सप्टेंबर रोजी येथे प्राण प्रतिष्ठा झाली. स्वामी नारायण मंदिराची भव्यता,एकता आणि भक्तीचा संगम पाहताच मन हरकून जाते. जोधपूर शहराच्या मध्यभागी BAPS स्वामीनारायण मंदिर एक वास्तूकलेचा आणि भक्तीचा एक अद्वितीय नमुना म्हणून डौलानं उभं आहे. या भव्य मंदिरात मनाला अपार शांती मिळते. शाश्वत शांती, भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेने हे मंदिर बांधण्यात आले आहे. या ठिकाणी आत्म्याला सत, चित्त, आनंद, सत्य, चेतना आणि परम आनंद मिळतो.
भगवान स्वामीनारायण यांना समर्पित मंदिर
जोधपूर येथील हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. त्यांचे दिव्य जीवन आणि शिकवण हे हिंदू धर्माच्या शाश्वत तत्त्वांनुसार आणि नैतिक जीवन आण सामाजिक उन्नतीवर आधारीत आहे. त्यांचे दिव्य जीवन हे जगभरातील लाखो भक्तांना भक्ती, नीतीमत्ता आणि सत्य याचा दैनंदिन जीवनात आचारणात आणण्यासाठी मदत करते आणि प्रेरणा देते.
या मंदिरामागील खरी प्रेरणा परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज हे आहेत. या निःस्वार्थ गुरुची नम्रता आणि करुणेमुळे असंख्य लोकांच्या जीवनात मोठा चमत्कार झाला. त्यांची आयुष्ये बदलली. त्यांनी जगभरात 1200 हून अधिक मंदिरे, सांस्कृतिक केंद्रे, रुग्णालये, शाळा आणि इतर अनेक समाजोपयोगी संस्थांची उभारणी केली. त्यांनी शांती, सौहार्द, नैतिक जीवनातून समाजाला उन्नत करण्याची प्रेरणा दिली.
सध्याचे परमपूज्य महंत स्वामी महाराज हे सध्याचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि बीएपीएसचे मुख्य महंत आहेत. त्यांच्या दैवी मार्गदर्शनाखाली या मंदिराची कल्पना समोर आली आणि लागलीच त्यासाठी अंमलबजावणी सुरू झाली. या मंदिर उभारणीसाठी स्वामी महाराजांनी जगभरातील त्यांच्या भक्तांना प्रेरित केले. त्यांच्या निःस्वार्थ सेवेतून हे मंदिर उभारल्या गेले.
हे भव्यदिव्य मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे. मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे. यामध्ये मोठा सभामंडप, नीलकांत अभिषेक मंडप, गुरुच्या प्रवचनाचे रसग्रहण करण्यासाठी एक मोठे सभागृह तर मुलांसाठी खास बागिचा तयार करण्यात आलेला आहे.