यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले

| Updated on: Apr 25, 2021 | 12:39 PM

देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोना संकटात सापडल्याने लोक अक्षरश: काकुळतीला आले आहेत. (System failed, so it's important to do 'jan ki baat', says rahul gandhi)

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता जन की बात करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले
Rahul Gandhi
Follow us on

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोना संकटात सापडल्याने लोक अक्षरश: काकुळतीला आले आहेत. संकटाच्या या काळात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले आहे. (System failed, so it’s important to do ‘jan ki baat’, says rahul gandhi)

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो सर्व राजकीय कामं सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

हल्ले सुरूच

राहुल गांधी हे सातत्याने ट्विटरवरून केंद्र सरकारला सल्ले देतानाच केंद्राच्या कारभारावरही ताशेरे ओढत आहेत. त्यांनी नुकतंच एक ट्विट करून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. केंद्र सरकारने पीआर आणि अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्या ऐवजीत व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन व इतर सेवांकडे लक्ष द्यावे. हे आमचे नम्र आवाहन आहे. येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर रुप धारण करणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशाने सज्ज राहिलं पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे, असं राहुल म्हणाले होते.

देशात किती रुग्ण?

देशातील कोरोनाची परिस्थिती रोज बिघडत आहे. पुन्हा एकदा तीन लाखाच्यावर कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 3, 49,691 रुग्ण आढळले आहेत. तर 2767 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 2,17,113 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णा एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. देशात ऑक्सिजनसह बेड्सचीही कमतरता भासत आहे. त्याशिवाय अनेक राज्यांमध्ये लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद करावे लागले आहेत. (System failed, so it’s important to do ‘jan ki baat’, says rahul gandhi)

 

संबंधित बातम्या:

Sharad Pawar health update: शरद पवार पुन्हा रुग्णालयात, तोंडाचा अल्सर काढला; नवाब मलिक यांचं ट्विट

Mann Ki Baat: कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे; मोदींची ‘मन की बात’

BREAKING : दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

(System failed, so it’s important to do ‘jan ki baat’, says rahul gandhi)