AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या एक्झिट पोलनुसार, विजय मुख्यमंत्रीपदासाठी एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा अधिक पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. ॲक्सिस माय इंडियाने विजय यांना 37%, तर स्टॅलिन यांना 35% पसंती दिली आहे. मात्र, इतर अनेक सर्वेक्षणांमध्ये DMK पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे. विजय यांच्या TVK पक्षाची पहिल्याच निवडणुकीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे, तरीही अंतिम निर्णय 4 मे रोजी स्पष्ट होईल.

Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…
तामिळनाडूत कोणाचं येणार सरकार ?
| Updated on: Apr 30, 2026 | 8:56 AM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 नंतर आलेल्या एग्झिट पोलमधूनएक रंजक चित्र समोर आलं आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या ताज्या सर्व्हेनुसार, तामिळनाडूत मोठा उलटफेर होऊ शकतो. चित्रपट अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय, हे आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, 37 टक्के लोकांनी तमिळगा वेत्री कळघमचे (TVK) प्रमुख विजय यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे, तर एम. के. स्टॅलिन यांना 35 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे, या दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगणार असल्याचे दिसत आहे.

तर माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 22 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. भाजप नेते अण्णामलाई यांना केवळ 2 टक्के लोकांची पसंती आहे. नाम तमिळर कचीचे नेते सेंथमिझन सीमन यांना 3 टक्के लोकांचा पाठिंबा असून, 1 टक्के लोकांनी एकतर दुसऱ्या कोणाला तरी निवडले आहे किंवा ते कोणताही निर्णय घेऊ शकलेले नाहीत.

तामिळनाडूत कोणाचं येणार सरकार ?

एक्झिट पोलच्या उर्वरित आकडेवारीवर नजर टाकल्यास, बहुतेक सर्वेक्षणांनुसार एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकतं. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्रीपदासाठी विजय हे पसंतीचे उमेदवार दिसत असले तरी, सरकार स्थापन करण्यात DMKचे पारडं जड राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विजय यांचा पक्ष, टीव्हीके, आपल्या पहिल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. विविध एजन्सींच्या अंदाजात थोडीफार तफावत दिसून येत आहे. पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार टीव्हीकेला 18 ते 24 जागा मिळतील, तर पी-मार्कच्या अंदाजानुसार त्यांना 16 ते 26 पर्यंत जागा मिळतील. ॲक्सिस माय इंडियाचे अंदाज वेगळे असून, त्यांच्या अंदाजानुसार टीव्हीकेला 98 ते 120 जागा मिळतील, हा अतिशय मोठा आकडा आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी एक नवीन वळण येताना दिसत असून एक नवीन पक्ष आणि एका नवीन चेहऱ्याने प्रबळ आव्हान उभं केलं आहे. मात्र हे केवळ अंदाज आहेत आणि खरं चित्र काय ते 4 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या जाते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!