Vijay TVK : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा चमत्कार घडवणाऱ्या विजयच्या यशावर त्याचे वडिल म्हणाले, माझ्या मुलाने..
Vijay TVK : पश्चिम बंगालनंतर दुसरा आश्चर्यकारक कौल दिला तो तामिळनाडूने. खरंतर तामिळनाडूतील मतदानानंतर सर्वच एक्झिट पोल्सनी द्रमुकच्या विजयाची शक्यता वर्तवली होती. पण निकाल पूर्णपणे उलटा लागला.

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदूच्चेरी. यात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचा निवडणूक निकाल खूप खास आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा स्वबळावर सरकार बनवणार आहे. डावे, तृणमुल काँग्रेस यांच्यानंतर आता भाजपच्या रुपाने हिंदुत्वाच्या विचारसरणीला पश्चिम बंगालने स्वीकारलं आहे. पश्चिम बंगालचं राजकारण हे नेहमीच रक्तरंजित राहिलं आहे. त्याशिवाय बंगालची संस्कृती, भाषा यांचं एक वेगळं स्थान आहे. अशा राज्यात उत्तरेतून येणाऱ्या एकापक्षाने सत्ता मिळवणं एक मोठी बाब आहे. पश्चिम बंगालच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं. कारण तिथे तृणमुल हरवणं हे सोप नव्हतं. पण भाजपने हे करुन दाखवलय.
पश्चिम बंगालनंतर दुसरा आश्चर्यकारक कौल दिला तो तामिळनाडूने. खरंतर तामिळनाडूतील मतदानानंतर सर्वच एक्झिट पोल्सनी द्रमुकच्या विजयाची शक्यता वर्तवली होती. पण निकाल पूर्णपणे उलटा लागला. अभिनेता थलपती विजयच्या TVK पक्षाने थेट सत्ता मिळवण्यापर्यंत मजल मारली आहे. स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात विजयच्या पक्षाने एवढा मोठा पल्ला गाठला आहे. करुणानिधी यांच्या द्रमुक, जयललिता यांच्या अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना विजयच्या TVK ने मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूतील या राजकीय बदलाची सगळ्या देशभरात चर्चा आहे. मागची अनेक दशकं द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवतीच तामिळनाडूच राजकारण फिरत होतं.
विजयचे वडिल काय म्हणाले?
विजयच्या पक्षाने मिळवलेल्या या विजयावर त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजयला नेहमीच तामिळनाडूसाठी काहीतरी करायचं होतं असं ते म्हणाले. विजयचे वडिल एस ए चंद्रशेखर हे सुद्धा चित्रपट सृष्टीशी संबंधित असून ते दिग्दर्शक आहेत. 1980 च्या दशकात त्यांनी बाल कलाकार म्हणून विजयला लॉन्च केलं. “मागच्या 30 वर्षांपासून विजयला तामिळनाडूसाठी काहीतरी करायचं आहे. माणसू म्हणून मला प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही फक्त कलाकार राहू नका. तुमच्याकडे सामाजिक विचार असला पाहिजे. मागच्या 30 वर्षांपासून तामिळनाडूसाठी काहीतरी करायचं हे त्याच्या डोक्यात आहे. हळूहळू तो त्या दिशेने गेला. आता तो मुख्यमंत्री होणार आहे” असं चंद्रशेखर म्हणाले.