‘तामिळनाडूचे नेते तामिळमध्ये सही करीत नाहीत’, भाषावादावर पीएम मोदी यांची स्टॅलिन यांच्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममध्ये पंबन ब्रिजचे उद्घाटन केले. त्यांनी तामिळनाडूला रस्ते आणि रेल्वे संबंधीत अनेक योजनांची भेट देत त्यांचे भूमीपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ स्वामी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला आणि रामनवमी शुभेच्छाही दिल्या....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर रामेश्वरम येथे नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. हा आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे समुद्री पुल आहे. त्याची लांबी २.८ किमी आहे. हा पुल रामेश्वरमला मंडपमशी जोडतो. या नंतर पीएम मोदी यांनी रामनाथ स्वामी मंदिरात पूजा केली आणि तामिळनाडूच्या सुमारे ८३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. यावेळी तामिळ भाषेवरुन सीएम स्टॅलिन यांना मोदी यांनी टोमणा देखील मारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर तामिळनाडूतील ८३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे रविवारी लोकार्पण केले. यात पंबन रेल्वे समुद्री पुल,नवीन रेल्वे सेवा, आणि रामेश्वरम ते चेन्नईपर्यंत चांगल्या कनेक्टीव्हीटीचा समावेश आहे. पंबन ब्रिज आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पुल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्या भाषावादावर तामिळनाडूंचे सीएम एम.के.स्टॅलिन यांच्यावर टीकाही केली.
भाषावादावर पंतप्रधानमंत्री मोदी यांची टीका
भाषावादावर पीएम मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.अनेक नेत्यांची मला पत्र मिळत असतात. परंतू त्यावर कधी तामिळ भाषेत हस्तांक्षर केलेले नसते. जर तामिळ भाषेवर एवढा अमिभान असेल कर तामिळ भाषेत हस्ताक्षर करायला हवे ना..तामिळ भाषा आणि तामिळ परंपरेला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवण्याच्या दिशेने सरकार काम करीत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना टोला लगावताना म्हटले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील टळक मुद्दे
* पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज राम नवमीचा पवित्र दिवस आहे. या दिवशी मला रामनाथ स्वामी मंदिर मध्ये प्रार्थना करण्याची संधी मिळाली हे माझे परमभाग्य आहे. आताच काही वेळा पूर्वी अयोध्येच्या भव्य राममंदिरात रामलल्लाचा सुर्य किरणांद्वारे भव्य तिलक समारंभ झाला आहे. भगवान श्रीराम यांचे जीवन, त्यांच्या राज्यातून मिळणारी सुशासनाची प्रेरणा राष्ट्र निर्माणाचा मोठा आधार आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर तामिळनाडूत 8300 कोटींची विकास योजनांचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी आनंदी आहे.
* गेल्या 10 वर्षांत भारताने आपल्या इकॉनॉमीची साईज दुप्पट झाली आहे. एवढ्या वेगाने वाढ होण्याचे कारण म्हणजे आपले आधुनिक इन्फ्रास्ट्रक्ट्र्चर देखील जबाबदार आहे.गेल्या 10 वर्षांत आम्ही रेल्वे, रोड, एअरपोर्ट, पाणी, पोर्ट, वीज, गॅस पाईप लाईन सारख्या इन्फ्रास्ट्रक्ट्र्चरचे बजेट सुमारे 6 पट वाढले आहे..
* हे असे नगर (रामेश्वरम) आहे जे हजारो वर्षे पुरातन आहे. आता ते 21 व्या शतकाच्या इंजिनिअरिंगच्या चमत्काराने जोडले जाणार आहे. पंबन ब्रिज भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे. आता याच्या खालून मोठ मोठी जहाजे येथून पार होतील आणि ट्रेन आता अधिक वेगाने धावतील असे मोदी यावेळी म्हणाले.
पंबन रेल्वे ब्रिजचे पीएम नरेंद्र मोदी यांनी केले उद्धाटन
आज देशभरात अनेक मेगा प्रोजेक्ट्सची निर्मिती होत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच पुलांपैकी एक चिनाब ब्रिजची निर्मिती पूर्ण झाली आहे. मुंबईत अटल सेतु तयार झाला आहे.हा भारताचा सर्वात मोठा समुद्री पुल आहे. आसामचा बोगीबील ब्रिज ब्रह्मपुत्र नदीवर बांधला गेला आहे.हा देशाचा सर्वात मोठा रेल्वे रोड ब्रिज आहे. हे सर्व भारताच्या विकासाचा वेग आणि आपल्या इंजिनिअर्सच्या क्षमतेची साक्ष दाखवत आहेत.
