Tariff Effect : ही भारतीय भाजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकात दम करणार, भयंकर भाव भडकणार, का आहे अमेरिकेत एवढी मागणी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आता भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांवर झाल्याचं पहायला मिळत आहे. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Tariff Effect : ही भारतीय भाजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकात दम करणार, भयंकर भाव भडकणार, का आहे अमेरिकेत एवढी मागणी?
| Updated on: Aug 30, 2025 | 1:56 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर टॅरिफ लावला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. मात्र एका रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तामध्ये झालेल्या युद्धविरामाचं श्रेय हे भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं नसल्यानं ते नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. कारण काहीही असलं तरी आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहेत, त्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत महाग होणार, याचा परिणाम म्हणून अमेरिकेतल्या बाजारपेठेमध्ये भारतीय वस्तूंच्या मागणीमध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आता टॅरिफचे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे, याचा सर्वात मोठा फटका हा सीफूड कंपन्यांना बसला आहे. सीफूड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच दुसरा महत्त्ववाचा फटका म्हणजे भारती रुपयामध्ये देखील डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान या टॅरिफचा जसा भारतावर परिणाम होत आहे,  तसा तो अमेरिकेच्या ग्राहकांवर देखील होत आहे, अमेरिकेत महागाई वाढली आहे.

दरम्यान अशी एक भाजी आहे, ज्या भारतीय भाजीला अमेरिकेत मोठी मागणी आहे. ती भाजी म्हणजे गवार आणि टॅरिफ लावल्यानंतर सहाजिकच गवारीचे भाव देखील अमेरिकेत कडाडले आहेत. जरी भाव वाढले असले तरी देखील या भाजीची मागणी अजूनही कमी झालेली नाहीये.

का आहे अमेरिकेत मागणी? 

आपल्याकडे गवार म्हणजे कस्टड बिनच्या शेंगांची फक्त भाजी केली जाते, पण अमेरिकेत मात्र गवारांच्या बियांचा वापर करून गवार गमचीची निर्मिती केली जाते. या गवारीच्या बियापासून तयार करण्यात येणाऱ्या गवार गमला अमिरिकेत मोठी मागणी आहे, आईस्क्रिम पासन ते कागदापर्यंत आणि औषधांपासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंतच्या सर्व वस्तूंमध्ये गवार गमचा वापर केला जातो. मात्र आता टॅरिफमुळे भारतातून निर्यात होणारी गवार देखील तिकडे महागणार आहे, याचा फटका हा अमेरिकेतील अनेक उद्योगांना बसू शकतो.