Tejas Fighter Jet : आधीच एअर फोर्सला तेजस विमानं उशिराने मिळतायत, त्यात आता अमेरिकन कंपनी GE मुळे बसला पुन्हा झटका

Tejas Fighter Jet : तेजस हे भारताचं स्वेदशी बनावटीचं फायटर विमान आहे. आता या तेजस प्रकल्पाला अमेरिकन कंपनी GE मुळे पुन्हा झटका बसला आहे. HAL आणि GE मध्ये 99 F404-IN20 इंजिन पुरवठ्याचा करार झाला आहे.

Tejas Fighter Jet : आधीच एअर फोर्सला तेजस विमानं उशिराने मिळतायत, त्यात आता अमेरिकन कंपनी GE मुळे बसला पुन्हा झटका
Tejas Fighter Jet
Image Credit source: X/@SpokespersonMoD
| Updated on: Jun 27, 2026 | 1:26 PM

तेजस फायटर जेट हा भारताचा सर्वात महत्वकांक्षी संरक्षण प्रोजेक्ट आहे.आता तेजस विमान योजनेला मोठा झटका बसला आहे. अमेरिकी कंपनी GE कडून हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालेल्या सहाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळला आहे. या अडथळ्यामुळे फायटर जेट डिलीवरीला अजून विलंब होण्याची शक्यता आहे. वेळेवर फायटर जेट मिळत नसल्याने संरक्षण मंत्रालय आता HAL वर मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करत आहे. एअर फोर्सच्या स्क्वाड्रान्समध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाला लवकरात लवकर एअर फोर्सच्या ताफ्यात फायटर जेट्सचा समावेश करायचा आहे. अमेरिकेतून आलेलं हे सहावं इंजिन खराब निघालं आहे. मे महिन्यात ते भारतात आलं होतं. या इंजिनची क्वालिटी चेक सुरु असताना हा बिघाड लक्षात आला. HAL ने लगेच या मुद्यावरुन अमेरिकन कंपनी GE एयरोस्पेसला जाब विचारला आहे. इंजिनमधील ही खराबी दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकन कंपनीचे इंजिनिअर लवकरच भारतात येऊन बारकाईने तपास करणार आहात.

तपासणीनंतर हा टेक्निकल फॉल्ट दुरुस्त होणार असेल तर रिपेयरिंग होईल. अन्यथा जीई कंपनी त्याजागी दुसरं इंजिन देईल. पण या सगळ्या प्रक्रियेत तेजस विमानाच्या डिलिवरीला विलंब होईल. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही. सातवं इंजिन पुढच्या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये वर्ष 2021 मध्ये 5,375 कोटींचा करार झाला होता. त्यानुसार 99 F404-IN20 इंजिनचा GE कडून पुरवठा होणार आहे.

सध्या इंडियन एअर फोर्सकडे किती स्क्वाड्रन्स?

इंजिन डिलिवरीला होणाऱ्या या विलंबाने इंडियन एअर फोर्सची चिंता वाढवली आहे. विमानं वेळेवर तयार होत नसल्याने संपूर्ण शेड्युल बिघडून गेलं आहे. मिग-21 फायटर जेट सेवेतून निवृत्त झाल्यामुळे सध्या वायूसेनेच्या स्क्वाड्रन्सची संख्या घटली आहे. चीन-पाकिस्तानला एकाचवेळी मुकाबला करण्यासाठी आपल्याला 42 स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे. पण सध्या आपल्याकडे फक्त 29 स्क्वाड्रन्स आहेत. एखाद्यावेळी अचानक युद्धाचा प्रसंग उदभवल्यास एअरफोर्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. संरक्षण मंत्रालयाने HAL ला स्पष्ट संदेश दिला आहे की, कराराच्या अटींच उल्लंघन केल्यास आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो. एअरफोर्सचं समाधान झालं, तर 2026 च्या अखेरीस पहिली पाच तेजस MK1A फायटर विमानं एअरफोर्सला सोपवली जाऊ शकतात.

 

Follow Us