AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Python Viral Video : धावाधाव अन् पळापळ; भलामोठा अजगर अचानक कारमध्ये घुसला, पुढे नेमकं काय घडलं?

राजस्थानमध्ये भयंकर घटना घडली. एक भलामोठा साप अचानक कारमध्ये घुसला. त्यामुळे स्थानिकांची एकच धावाधाव झाली. जाणून घ्या संपूर्ण घटना

Python Viral Video : धावाधाव अन् पळापळ; भलामोठा अजगर अचानक कारमध्ये घुसला, पुढे नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 25, 2026 | 7:09 PM
Share

राजस्थानच्या उदयपूर शहरात एक खळबळ घटना उघडकीस आली आहे. शहरात एका कारमध्ये भलामोठा अजगर घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं. कारच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा गोंधळ उडाल्यानंतर एकच गर्दी झाली. अनेक जण कारपासून लांब उभे राहिले. लोकवस्तीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. भलामोठा हा अजगर थेट रस्त्यात उभ्या असलेल्या कारमध्ये घुसल्याने अनेकांची पळापळ झाली.

लोकांच्या समोर अजगर कारच्या इंजिनमध्ये घुसला. पुढे इंजिनमधून बोनेटपर्यंत पोहोचला. या अजगराला पाहून कारजवळील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांना कारमध्ये घुसलेला अजगर बाहेर कसा काढायचा, हा प्रश्न पडला. हा अजगर 10 फुटाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अजगर कारमध्ये घुसल्याने स्थानिक नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

कारचे बोनेट उघडलं, अन्…

अजगर कारमध्ये घुसल्यानंतर कोणतीही विपरीत घटना घडण्याआधी स्थानिकांनी सर्पमित्राला माहिती दिली. स्थानिकांनी सर्पमित्र राजेंद्र श्रीमाली यांना फोन करून माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच राजेंद्र श्रीमाली हे टीम आणि रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळी पोहोचले. सर्पमित्राने हळूवार पद्धतीने आणि सावधपणे कारच्या बोनेटमधून रेस्क्यू प्रक्रिया सुरू केली. सर्पमित्र राजेंद्र श्रीमाली यांनी कारचे बोनेट उघडलं. त्यानंतर अजगर बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजगर हा इंजिन आणि बोनेटमध्ये होता. या अजगराला सावधपणे कारमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर एका सुरक्षित बॅगेत ठेवलं. अजगराला रेस्क्यू केल्यानंतर लोकवस्तीपासून दूर जंगलात सोडण्यात आलं.

भलामोठा अजगर लपला कारमध्ये 

भल्यामोठ्या अजगराला जंगलात सोडल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा अजगर 10 मिनिटांपासून कारमध्ये लपला होता. परंतु या अजगराला (Python) बोनेटमधूनही सुरक्षितरित्या सर्पमित्र राजेंद्र यांनी काढलं. त्यामुळे नागरिकांनी सर्पमित्र राजेंद्र यांचे आभार मानले. अजगराला कोणत्याही प्रकारची इजा न होता, कारमधून बाहेर काढलं. त्यानंतर लोकवस्तीपासून दूर असलेल्या जंगलात सोडलं. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि लहान मुलांच्या मनातील साप, अजगराची दहशत कमी झाली.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत