युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियामधून हादरवणारी बातमी, अमेरिकेचं टेन्शन वाढलं, किम जोंग यांचा मोठा निर्णय

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान अमेरिकेचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर कोरियानं मोठा निर्णय घेतला आहे.

युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियामधून हादरवणारी बातमी, अमेरिकेचं टेन्शन वाढलं, किम जोंग यांचा मोठा निर्णय
kim jong un
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 7:47 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर कोरियानं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. उत्तर कोरियाने आपल्या सुपर पावर मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर कोरियाने आपल्या सुपर पावर मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. याबाबत उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाकडून रविवारी माहिती देण्यात आली. या पावर मिसाईलमुळे उत्तर कोरियाची ताकद आता आणखी वाढली आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरिया हा आपल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (आईसीबीएम) लाँच करण्यासाठी आपल्या सॉलिड -फ्यूल रॉकेट इंजिनचा उपयोग करण्याची योजना बनवत आहे. ही एक अशी मिसाईल आहे, जिच्या टप्प्यामध्ये अमेरिका देखील येणार आहे.

उत्तर कोरिया सातत्याने आपल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (आईसीबीएम) तंत्रज्ञानाला आधुनिक बनवत आहे. उत्तर कोरियाकडून आता पुन्हा एकदा आपल्या सुपर पावर मिसाइलची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या उपस्थितीमध्ये या मिसाईलची यशस्वी चाचणी झाली आहे. दरम्यान या संदर्भात उत्तर कोरियाकडून एक छायाचित्र जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये एका अनोळखी ठिकाणी उत्तर कोरिया आपल्या सुपर पावर मिसाइलची चाचणी करताना दिसून येत आहे. घटनास्थळी आगीच्या ज्वाळा निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

अमेरिकेचं टेन्शन वाढलं

दरम्यान सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. उत्तर कोरियानं जरी थेट इराणला पाठिंबा दिला नसला तरी देखील इराणचं समर्थन केलं आहे. जर इराणला काही मदत लागली तर आम्ही करू असंही उत्तर कोरियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये देखील उत्तर कोरिया आपला मित्र रशियाची मदत करत आहे. रशियाला सैन्यबळ देखील उत्तर कोरियानं पुरवलं होतं. त्यामुळे कोरियाकडून करण्यात आलेल्या या मिसाईल परीक्षणामुळे आता अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.

 

 

Follow Us