PUBG murder – 16 वर्षांच्या मुलाला व्हॉट्सअपवर मिळत होते डायरेक्शन, हत्येच्या वेळी आईच्या फोनवरच मिळत होत्या सूचना, नंतर चॅट आणि कॉल लॉग डिलिट

४ जूनच्या रात्री जेव्हा मुलाने आईची गोळी मारुन हत्या केली त्यावेळी त्याला कुटुंबातीलच कुणातरी व्यक्तीकडून सूचना मिळत होत्या. त्या सूचना साधना यांच्या मोबाईलवरच देण्यात येत होत्या. या मुलाकडेही एक मोबाईल होता, मात्र तो महिनाभरापासून रिचार्ज करण्यात आला नव्हता.

PUBG murder - 16 वर्षांच्या मुलाला व्हॉट्सअपवर मिळत होते डायरेक्शन, हत्येच्या वेळी आईच्या फोनवरच मिळत होत्या सूचना, नंतर चॅट आणि कॉल लॉग डिलिट
instruction on whatsappImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:57 PM

लखनौ- गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या कथित पबजी हत्याकांड (PUBG murder case)प्रकरणात आता नवनव्या बाबी समोर येत आहेत. 16 वर्षांच्या मुलाने आईची हत्या (boy killed mother)केल्यानंतर, आईच्या मोबाईलवरील चॅट, कॉल डिटेल्स आणि इतर डिटेल्स (Chatting and call log delete)डिलिट केल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र पुरावे नष्ट करण्यामध्ये स्वताला वाचवावे हा त्याचा हेचू नव्हताच तर त्याला कुटुंबातील जी व्यक्ती या हत्याकांडाबाबतच्या सूचना देत होती, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याने प्रय़त्न केल्याचे दिसते आहे. पोलिसांनी या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू नये यासाठी या अल्पवयीन मुलाने हे केल्याचे दिसते आहे. 7 जूनला जेव्हा पोलिसांनी साधना यांचा मृतदेह घराच्या बाहेर काढला त्यावेळी त्यांचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता. या मोबाईलच्या माध्यमातून खरा प्रकार कळेल अशी अपेक्षा होती, मात्र फोन अनलॉक केल्यानंतर कॉल आणि चॅट डिटेल्स डिलिट करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

मुलाचा फोन रिचार्ज नव्हता, आईचा फोन वापरत होता

आईच्या हत्येतील आरोपी मुलाने आणि पडद्यामागच्या सूत्रधाराने या प्रकरणी आधीयोजन केल्याचे दिसते आहे. ४ जूनच्या रात्री जेव्हा मुलाने आईची गोळी मारुन हत्या केली त्यावेळी त्याला कुटुंबातीलच कुणातरी व्यक्तीकडून सूचना मिळत होत्या. त्या सूचना साधना यांच्या मोबाईलवरच देण्यात येत होत्या. या मुलाकडेही एक मोबाईल होता, मात्र तो महिनाभरापासून रिचार्ज करण्यात आला नव्हता.

कुणाच्या सांगण्यावरुन कॉल लॉग केले डीलिट

दुसरी एक थियरी असेही सांगते की, आई इस्टेट एजंट अंकलना भेटते हे मुलाने वडिलांना सांगितल्यानंतर, आईने त्याच्याकडचा मोबाईल काढून घेतला होता. त्यानंर मुलगा आईच्या मोबाईलवरुनच कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात होता. या प्रकरणाचा मूख्य सूत्रधार आईच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉलद्वारे आरोपी मुलाच्या संपर्कात होता, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. व्हॉट्सअप कॉल्सच्या डिटेल्स मिळणार नाहीत, याची या सूत्रधाराला कल्पना होती, असाही पोलिसांना संशय आहे. मोबाईल जप्त झाल्यावर लगेच कॉल लॉग चेक केला असता तर सूत्रधाराची माहिती पोलिसांना मिळाली असती. त्यामुळेच या सूत्रधाराच्या आदेशाने हत्या झाली त्या दिवसाचे, आईच्या मोबाईलवरील सर्व कॉल लॉग मुलाने डिलिट केले असल्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मोबाईलच्या सीडीआरमध्ये 4 जून रोजी खूप कमी नंबर सापडले

हत्येनंतर आरोपी मुलाने आई साधनाच्या मोबाईलवरील 4 जूनचे रात्री ३ पर्यंतचे सर्व कॉल डिटेल्स डिलिट केल्याचे दिसते आहे. तर पोलिसांनी काढलेल्या कॉल डिटेल रिपोर्ट म्हणजेच सीडीआरमध्ये 4 जून रोजी साधना यांचे खूप कमी मोबाईल नंबरशी बोलणे झाले होते. हे सर्वजण कुटुंबातीलच सदस्य होते. याचाच अर्थ असा की मुलाला हत्येसाठीच्या सूचना जी व्यक्ती देत होती, तिनेच पुरावे नष्ट करण्यास मुलाला सांगितले होते.

आधी शिक्षा देऊ म्हणणारे वडील आता वाचवण्याच्या प्रयत्नात

हत्याकांड झाल्यानंतर, साधना यांचे पती नवीन हे आपल्या मुलाला आयुष्यभर जेलमध्ये टाका असे म्हणत होते. पत्नीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मात्र त्यांचा सूर बदलला आणि ते मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करु लागल्याचे दिसते आहे. मुलाचा जामीन करावा यासाठी त्यांनी कॉलनीत राहणाऱ्य़ा एका समाजसेवक आणि भाजपाच्या नेत्याकडेही मदत मागितल्याची माहिती आहे. मात्र या नेत्याने या प्रकरणात मदत करणार नाही असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर वडील नवीन यांच्याकडून काही बड्या वकिलांशी संपर्क साधण्यात आल्याचेही सांगण्यात येते आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.