Corona Vaccine : कोरोना लढ्यात आणखी एक खूशखबर; 7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरी

सीरम इन्स्टिट्यूटने 16 मार्च रोजी कोवोव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी अर्ज केला होता. गेल्या महिन्यात विषय तज्ज्ञ समितीने सिरम इन्स्टिट्यूटकडे आणखी काही डेटाची मागणी केली होती. सुरुवातीला सिरम इन्स्टिट्यूटने 2 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना कोवोव्हॅक्स लस देण्यासाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती, परंतु तज्ज्ञ समिती 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मान्यता दिली आहे.

Corona Vaccine : कोरोना लढ्यात आणखी एक खूशखबर; 7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरी
7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 12:17 AM

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ होऊ लागली आहे. याचदरम्यान जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट धडकण्याचीही भिती आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लढा लसीकरणाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. याचअंतर्गत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने आज सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्स (Covovax) या कोरोना प्रतिबंधक लसीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या लसीचा काही अटींसह 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास डीसीजीआय (DCGI)ने मंजुरी (Permission) दिली आहे. कोरोना संसर्गामुळे मुलांना धोका असल्याच्या अनुषंगाने कोवोव्हॅक्स लसीचा 7 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाला गती मिळून त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जेन्नोवा बायोफार्माक्युटिकलच्या एमआरएनए लसीचे दोन डोस देण्यासही मंजुरी

न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी जेन्नोवा बायोफार्माक्युटिकलच्या एमआरएनए लसीचे दोन डोस देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या लसीचा वापर 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांवर केला जाईल. पहिली लस असेल जी 2-8 अंश सेंटीग्रेड तापमानात स्थिरतेसह संग्रहित केली जाऊ शकते, अशी माहिती डीसीजीआयशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मागील आठवड्यात विषय तज्ज्ञ समितीने 7 ते 11 वर्षे वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी देण्याची शिफारस केली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने मार्चमध्ये केला होता अर्ज

सीरम इन्स्टिट्यूटने 16 मार्च रोजी कोवोव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी अर्ज केला होता. गेल्या महिन्यात विषय तज्ज्ञ समितीने सिरम इन्स्टिट्यूटकडे आणखी काही डेटाची मागणी केली होती. सुरुवातीला सिरम इन्स्टिट्यूटने 2 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना कोवोव्हॅक्स लस देण्यासाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती, परंतु तज्ज्ञ समिती 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एनटीएजीआयच्या कोविड-19 कार्यगटाची एक बैठक एप्रिलमध्ये झाली होती. त्या बैठकीत कोवोव्हॅक्स लसीच्या डेटाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही लस राष्ट्रीय कोविड-19 लसीकरणाला दिली जावी अशी शिफारस करण्यात आली होती. कोवोव्हॅक्स लसीचा लसीकरण कार्यक्रमात समावेश करा, जेणेकरून 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना लसीकरण करता येईल, असे तज्ज्ञांनी सुचवले होते. (The Drug Controller General of India today conditionally approved the Covovax vaccine of Serum Institute)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.