AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big news: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली म्हणून गळाच कापला, दिवसाढवळ्या दुकानात केले तलवारीने वार, हत्येचा व्हिडीओही केला शूट

धानमंडी येथील भूतमहल परिसरात कन्हैय्यालाल तेली यांचे सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बाईकवर दोन गुंड आले. कपड्यांचे माप देण्याच्या बहाण्याने ते दुकानात शिरले. कन्हैय्यालाल यांना काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Big news: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली म्हणून गळाच कापला, दिवसाढवळ्या दुकानात केले तलवारीने वार, हत्येचा व्हिडीओही केला शूट
Udaypur murderImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jun 28, 2022 | 7:28 PM
Share

उदयपूर – मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भाजपातून प्रवक्तेपदावरुन हटविण्यात आलेल्या  नुपूर शर्माचे (Nupur Sharma)समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली म्हणून, एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या (cut the throat)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानातील उदयपूरमध्ये (Udaypur, Rajasthan) हा प्रकार घडला आहे. हल्लेखोर मंगळवारी दिवसाढवळ्या या व्यक्तीच्या दुकानात शिरले आणि त्याचा गळा कापण्यात आला आहे. या संपूर्म प्रकाराचा व्हिडीओही तयार करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीच्या हत्येनंतर आरोपींनी सोशल मीडियावर हत्येची पोस्ट टाकत त्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.

माप देण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले

धानमंडी येथील भूतमहल परिसरात कन्हैय्यालाल तेली यांचे सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बाईकवर दोन गुंड आले. कपड्यांचे माप देण्याच्या बहाण्याने ते दुकानात शिरले. कन्हैय्यालाल यांना काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकापाठोपाठ एक अनेक तलवारींचे वार त्यांच्यावर करण्यात आले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

तातडीने पोलीस घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच जवळच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिकची टीमही पोहचली. त्यानंतर घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करुन घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करत, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सहा दिवस दुकान उघडले नव्हते

कन्हैय्यालाल हे गोवर्धन विलास परिसरात राहत होते. १० दिवसांपूर्वी कन्हैय्यालाल यांनी भाजपा प्रवक्त्यापदावरुन हटवण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या होत्या. सतत येत असलेल्या या धमक्यांनी कन्हैय्यालाल हैराम झाले होते. त्यामुळे सहा दिवस त्यांनी त्यांचे दुकान उघडलेच नव्हते. तसेच धमक्या देणाऱ्या तरुणांविरोधात पोलीसांत तक्रारही नोंदवली होती. पोलिसांनी थोडे दिवस सांभाळून राहा असे सांगू या धमक्यांना गांभिर्याने घेतले नव्हते.

घटनेनंतर पोलिसांना आली जाग

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलण्यात आली. तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंडोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला. यानंतर त्या ठिकाणी राहणाऱ्यांनी आंदोलन केले. मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. शहरातील ५ परिसरातील बाजार बंद करण्यात आले आहेत. अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात काही आरोपींची ओळख पटली असून, त्यांना पकडण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. आरोपींच्या तपासासाठी टीम रवाना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल