Girl Suicide : सोशल मीडियावर प्रेम, फोनवरुन वाद; बारावीच्या विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

मुलीचा फोन बिझी लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलीचे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उटलले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनसाठी कालना अनुमंडल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Girl Suicide : सोशल मीडियावर प्रेम, फोनवरुन वाद; बारावीच्या विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्या
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 15, 2022 | 8:58 PM

पश्चिम बंगाल : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात घडली आहे. विद्यार्थीनीने आधी गळ्यात फास अडकवला आणि सेल्फी (Selfie) घेतला. मग प्रियकराला हा फोटो पाठवून तिने आत्महत्या केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. मुलीचा फोन बिझी लागल्याने दोघांमध्ये वाद (Dispute) झाला. त्यानंतर मुलीचे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उटलले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनसाठी कालना अनुमंडल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

मुलीचा फोन बिझी लागल्याने दोघांमध्ये वाद

पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालना येथील कुमार पारा परिसरात राहणाऱ्या मुलीचे मुंबईत राहणाऱ्या एका युवकासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांमध्ये रोज बोलणे होऊ लागले. दोघेही मोबाईलवर आणि सोशल मीडियावर बोलत असत. मंगळवारी प्रियकराने फोन केला तेव्हा मुलीचा फोन बिझी लागल्याने प्रियकर तिच्यावर रागावला आणि रिलेशन संपवण्याची धमकी त्याने दिली. या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मुलीला प्रियकर आपले नाते तोडेल अशी भीती वाटू लागली. या तणावातून मुलीने गळ्यात फास अडकवून सेल्फी काढून प्रियकराला पाठवून आत्महत्या केली, असे मुलीच्या घरच्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. दरम्यान, मुलीच्या प्रियकराची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. (The lover committed suicide by hanging himself due to dispute in a love affair)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें