Anant Ambani | अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला येणार जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, ज्याच्या मुठीत आहे संपूर्ण जग
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाहपूर्व सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती या सोहळ्याला येणार आहेत. मात्र, यापैकी एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे. कोण आहे ही व्यक्ती?
नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या 12 जुलै रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. त्याआधी 1 ते 3 मार्च या कालावधीत जामनगरमध्ये विवाहपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, जगातील सर्वात मोठी शक्तीशाली व्यक्ती उपस्थित रहाणार आहे. भारताच्या जीडीपीच्या अडीचपट आणि अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मे इतकी त्या व्यक्तीची मालमत्ता आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला उपस्थित रहाणारी ही जगातली सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे लॅरी फिंक. जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ब्लॅक रॉकचे (BlackRock) ते CEO आहेत. फिंक हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. याचे कारण म्हणजे जगात $10 ट्रिलियन इतक्या किमतीची त्यांची मालमत्ता आहे. ब्लॅक रॉक कंपनी जगातील एकूण शेअर्स आणि बाँडपैकी 10 टक्के शेअर्स हाताळते.
ब्लॅक रॉक ही जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे. संपूर्ण जग या अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीच्या ताब्यात आहे. जगभरात प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये त्याची भागीदारी आहे. ब्लॅक रॉकचे मुख्यालय अमेरिकेत Aआहे. पण, त्यांची गुंतवणूक जगभर पसरली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये ब्लॅक रॉकची 5.19% आणि Apple मध्ये 5.14% हिस्सेदारी आहे. त्याचप्रमाणे Amazon, Nvidia, Google, Meta आणि Tesla मध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. भारतातीलही अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही त्याचा हिस्सा आहे.
ब्लॅक रॉकची सुरुवात कशी झाली?
ब्लॅक रॉक कंपनीची स्थापना फिंक यांनी 1988 मध्ये केली. फिंक हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. फिंक यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता. पण, पैसे कमवण्याकडे ते इतके आकर्षित झाले होते की ते शेअर बाजारात उतरले. वयाच्या २३ व्या वर्षी बोस्टन डायनॅमिक्स बँकेमधून त्यांनी करिअरला सुरुवात केली. कर्ज देण्याचे सिंडिकेशन सुरू करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
वयाच्या 31 व्या वर्षी ते बोस्टन डायनॅमिक्स बँकेचे एमडी झाले. एका वर्षात त्यांनी एक अब्ज डॉलर्स कमावले. फिंक यांनी अधिक जोखीम घेतली. परंतु, एका तिमाहीत बँकेचे $100 दशलक्ष नुकसान झाले त्यामुळे बँकेने त्यांना कार्यमुक्त केले. 1988 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी फिंक यांनी स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ब्लॅकस्टोन इंकचे संस्थापक स्टीव्ह श्वार्झमन यांचा त्यांनी हात धरला.
ब्लॅकस्टोनने फिंकसोबत भागीदारी केली आणि $5 दशलक्ष गुंतवणूक केली. फिंकला काही मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी दिल्या होत्या. फिंक यांनी हे काम अतिशय उत्तमरीत्या पार पाडले. मग, त्यांची गाडी पुढे जाऊ लागली. अवघ्या पाच वर्षांत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता $20 बिलियनवर पोहोचली. मात्र, फिंक आणि स्टीव्ह यांच्यात मतभिन्नता झाली. त्यानंतर फिंक यांनी स्वतंत्र कंपनी ब्लॅक रॉकची स्थापना केली. यानंतर फिंक यांनी मागे वळून पाहिले नाही. आज Black Rock जगभरातील कंपन्या आणि सरकारांची मालमत्ता व्यवस्थापित करते.
जगात तीन मोठ्या फंड मॅनेजिंग कंपन्या आहेत. यात ब्लॅकरॉक, व्हॅनगार्ड आणि स्टेट स्ट्रीट यांचा समावेश आहे. या तीन कंपन्या मिळून अमेरिकेच्या GDP च्या 70% एवढी मालमत्ता व्यवस्थापित करतात. Black Rock ला जगातील सर्वात प्रभावशाली वित्तीय संस्थेचा पुरस्कार देखील मिळाला आहे. 2008 मध्ये आर्थिक संकटामुळे मोठ्या कंपन्या अडचणीत आल्या असताना अमेरिकन सरकारने ब्लॅकरॉकची मदत घेतली. यावरून तिची ताकद किती आहे, याचा अंदाज येतो.
रिलायन्ससोबत असे आले संबंध
फिंक हे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुकेश अंबानी यांची भेट घेतली. नवी मुंबईतील जिओ कॅम्पस आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिलायन्सच्या रिटेल हबला त्यांनी भेट दिली होती. त्याआधी जुलैमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांनी संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती. ऑगस्टमध्ये रिलायन्सच्या एजीएममध्ये फिंक म्हणाले होते की ब्लॅकरॉक भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे.