Jyoti Malhotra News : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ‘आय लव्ह यु’ कोणाला म्हणाली ? तपास यंत्रणा कामाला लागली
Jyoti Malhotra Remand : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीचा पोलिस रिमांड बुधवारी संपत आहे, पोलीस तिला कोर्टात हजर करत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणा तिच्या आर्थिक स्रोत आणि पुराव्यांच्या मागे लागली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा पोलीस रिमांड बुधवारी संपत आहे. तिला कोर्टात सादर करुन पुन्हा रिमांड मागितली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशी ज्योतीला कुठून फंड येत होता याचा तपास सुरु आहे.परदेशातून तिला हवालाद्वारे पैसे मिळाले होते का याचा तपास केला जात आहे. तिच्या जवळ एक डायरी सापडली असून त्यात तिने काही खाजगी बाबी लिहिलेल्या आहेत. प्रवासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत या डायरीची आठ पाने इंग्रजीत तर तीन पाने हिंदीत लिहीली आहेत. ज्यात पाकिस्तानचा दौरा आणि काही अनुभव तिने लिहिलेले आहेत. एका पानावर तिने आय लव्ह यु लिहीले आहे. काय आहे नेमके या मागे याचा पोलिस तपास करीत आहेत.
घरात सापडली डायरी
पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात अटक झालेल्या युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी १८-१९ मेच्या रात्री हरियाणाच्या हिसार येथील तिच्या घरातून अटक केली. त्यावेळी घरातील तिचे संगणक, मोबाईल आणि डायरी जप्त केली आहे. मिडिया रिपोर्ट नुसार तिच्या पर्सनल डायरीच्या आधारे तिच्याशी कोणी रिलेशनमध्ये होते का याचा तपास पोलिस करीत आहे. या डायरीच्या एका पानावर तिने लिहीलेय की सविताला सांगणे की फ्रुट आणणे. घराची काळजी घेणे. मी लवकरच परतेन…
Love You Khush Mush
‘एक महीन्याची पॅनटॉप-डी, गुप्ता डॉक्टरची औषधे एका महिन्यांची आणावीत.. ‘ या पानाच्या शेवटी तिने -Love You Khush Mush. हे लव्ह यू कोणासाठी लिहिलेय, याचा अर्थ काय ? आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.




बांग्लादेशात जाण्याची योजना
अन्य एका तपासात ज्योती हिला बांगलादेशात देखील जायचे होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बांग्लादेश दौऱ्या व्हीसासाठी तिचा अर्ज जप्त केला आहे. ज्योतीने २५ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगामचा दौरा केला होता. २२ एप्रिल रोजी पहलगामला झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तीन महिने आधी हा दौरा असल्याचे संशय येतो आहे. यावेळी तिने तेथील अनेक संवदेशनील चौकी आणि जागांची व्हिडीओग्राफी केली होती. आता तिच्या डायरीत आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटद्वारे काही धागेदोरे जुळतात याचा तपास फोरेन्सिक डिपार्टमेंटच्या मदतीने एनआयए, आयबी आणि हरियाणा पोलीस एकत्रित करीत आहेत.