अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं

भारताचे येत्या काही वर्षात वर्चस्व फक्त आशिया खंडातच नाही तर जगभरात वाढणार आहे. अमेरिकेचे राजदूत यांनी देखील भारताचे कौतूक केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान आणि चीनचे टेन्शन वाढले आहे. कारण दोन्ही देश हे भारताचे वर्चस्व वाढू नये म्हणून प्रयत्न करत असतात.

अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
usa on india
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 5:36 PM

India and USA : भारताने नेहमीच मित्रदेशांसोबत नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारत हा असा देश आहे जो कधीही कोणावर आधी हल्ला करत नाही. भारतावर अनेक देशांचा विश्वास आहे. म्हणूनच अनेक मुस्लीम देशही नेहमीच भारताचे कौतूक करत आले आहेत. इतकंच नाही तर इस्रायलने देखील भारतासाठी नेहमीच मदतीची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने देखील आता भारताचे कौतूक केले आहे. भारताचे होत असलेले कौतूक पाहून चीन आणि पाकिस्तान यांना नक्कीच मिर्ची लागली असेल.

अमेरिकेने केलेल्या या स्तुतीमुळे  शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताबद्दल जे काही बोलले त्यावरून भारताचे भविष्यातील स्थान कुठे असेल याचे नक्कीच संकेत मिळत आहेत. एरिक गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एकमेकांना पूरक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेसाठी भारताला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी इथेच थांबले नाहीत, ते म्हणाले की, तुम्हाला जर भविष्य बघायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्य अनुभवायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्यावर काम करायचे असेल तर भारतात या. मला युनायटेड स्टेट्स मिशनचा नेता म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

‘भारत हा महत्त्वाचा देश आहे’

एरिक गार्सेट्टी यांनी अनेकदा भारताचे कौतूक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी भारत हा सर्वात महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच त्यांनी राजदूताची भूमिका स्वीकारल्याचे याआधी गार्सेट्टी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटने आयोजित केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन डायलॉग्समध्ये बोलत असताना ते म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे या शतकातील सर्वात परिभाषित नाते आहे.

गार्सेटी हे बायडेन यांच्या जवळचे

एरिक गार्सेटी हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे एरिक यांनी केलेले विधान खूप महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे असतील याचे हे संकेत आहेत. गेल्या दशकात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध घट्ट झाले आहेत.अमेरिकेला भारताचे आशिया खंडातील आणि जगात वाढत असलेले वर्चस्व पाहता माहित आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे लोकं मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत देखील भारताला विशेष महत्त्व आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.