‘रेलवे आपकी संपत्ती है’ प्रवाशांनी फारच सिरियस घेतले! एसी डब्यातून ब्लँकेट- चादरीहून याची जास्त चोरी…

रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणारे प्रवासी म्हणजे जास्त उत्पन्न असल्याने ते चोरी करणार नाहीत असा तुमचा समज असेल मात्र, माहिती अधिकारात रेल्वेने दिलेले उत्तर धक्कादायक आहे.

रेलवे आपकी संपत्ती है प्रवाशांनी फारच सिरियस घेतले! एसी डब्यातून ब्लँकेट- चादरीहून याची जास्त चोरी...
indian railway bed rolls
| Updated on: Jul 13, 2026 | 8:07 PM

भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्वच्छ असावी, प्रवाशांनी जबाबदारीने वागावे म्हणून ‘रेलवे आपकी संपत्ती है’ असे स्लोगन तयार केले. परंतू हे स्लोगन रेल्वे प्रवाशांनी जास्तच मनावर घेतल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. कारण रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चादरी, उशा, ब्लँकेट्स आणि टॉवेल संदर्भात एक आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या एकूण आठ लाख एसी प्रवाशांपैकी दर १००० प्रवाशांपैकी सरासरी एक प्रवासी दर रात्री आपल्या सोबत बेडरोलचे कोणता न कोणता भाग चोरत असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

इंडियन एक्सप्रेसला RTI मधून मिळालेल्या एका आकडेवारीनुसार कोरोना काळानंतर जानेवारी २०२२ मध्ये चादरी, उशा आणि ब्लँकेट देण्याची सेवा पून्हा पूर्ववत झाली. तेव्हापासून ते मे २०२६ पर्यंत किमान १.२७ कोटी बेडरोलचे साहित्य चोरीला गेले आहे. साल २०२२ ते २०२५ च्या दरम्यान या चोरीत ५६ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सर्वाधिक काय चोरीला गेले ?

या चार वर्षांच्या काळात प्रवाशांनी लालसा किंवा चोरीच्या उद्देश्याने बेडरोल कंत्राटदारांना सुमारे १०४.५१ कोटींचा चूना लावला आहे. प्रवाशांच्या पसंदी क्रमानुसार सर्वाधिक चोरी होणाऱ्या प्रवाशी साहित्याची यादी समोर आली आहे.

चोरीला जाणारे साहित्याची यादी –

टॉवेल : 46.54 लाख (चोरी करायला सर्वात सोपे, म्हणून टॉपवर)

चादरी : 41.13 लाख

उशीचे कव्हर : 23.59 लाख

ब्लँकेट्स : 12.95 lakh

उशा : 2.76 लाख

बिकानेर आणि रांची सर्वात पुढे…

रेल्वेच्या 18 झोनच्या 54 विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार चोरीचा एकूण ६७ टक्के हिस्सा केवळ १० विभागीय मंडळांचा आहे. यात राजस्थानचे बिकानेर मंडळ सर्वाधिक चोरींनी त्रस्त आहे.

बिकानेरमध्ये 2022 च्या तुलनेत चोरी २.९९ लाखाने वाढून १२.३४ लाखांवर पोहचली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत चोरीच्या संख्येत ७९ टक्क्यांची घसरण आहे ( ही चोरी ३.२७ लाखांवरुन घटून ६८,०१३ नग झाली ) दक्षिण भारतातील दोन विभागीय मंडळातील तिरुचिरापल्ली आणि पालक्काड येथून चोरीची एकही तक्रार नोंद झालेली नाही.

प्रवाशांच्या चोरीचा फटका गरीब अटेंडेन्टना

रेल्वेच्या डब्यांमध्ये बेडरोल वाटण्याचे काम आणि गोळा करण्याचे काम खाजगी कंत्राटदारांना दिले आहे. ट्रेन सुटण्याआधी प्रवाशांकडून सामान पुन्हा घेण्याची जबाबदारी कोच अटेडन्टवर असते.

जेव्हा एखादा प्रवासी चादर वा टॉवेल आपल्या बॅगेल लपवून जातो,तेव्हा रेल्वे याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराच्या बिलातून कापले जाते. रेल्वे बोर्डाच्या २०१५ च्या सर्क्युलरनुसार हरवलेल्या सामानाची रिकव्हरी खालील दराने केली आहे.

उशांचे – 115 रुपये

चादरीचे – 198 रुपये

उशांचे कव्हर – 55 रुपये

टॉवलचे – 48 रुपये

ब्लँकेट – 343 रुपये

रिपोर्टनुसार सोलापूरचे एक बेडरोल पुरवठादाराने सांगितले की या नुकसानाला कंठाळून त्यांनी त्यांचे तीन वर्षांचे कंत्राट १४ महिन्यात समाप्त केले आहे. कंत्राटदार या नुकसानची भरपाई त्या गरीब अटेडेन्ट्सच्या सॅलरी कापून करत असते, जे दिवसरात्र कोचमध्ये ड्युटी करतात.

रेल्वेचे म्हणणे काय ?

या चोरीच्या प्रकरणाबद्दल लोकांनी तीव्र चिंता व्यक्त होत आहे. लिनन चोरी रोखण्यासाठी आणि दोषींच्या विरोधात कारवाईचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात रेल्वेचा स्टाफ किंवा अटेडेंट्सचा सहभाग असण्याबद्दल विचारले असताना त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. सध्या रेल्वेने या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त बजेट खर्च करुन नवीन बेडरोल सेट खरेदी करावे लागत आहेत.

 

Follow Us