महिला मध्यरात्रीनंतर गुगलवर सर्वाधिकवेळा सर्च करतात ही गोष्ट, डेटा अहवालामधून धक्कादायक माहिती
सध्याचं जग हे इंटरनेटचं युग आहे. आज आपण आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं गुगलवर शोधण्याचा प्रयत्न करतो. महिला देखील मोठ्या प्रमाणात गुगलची मदत घेतात, याच संबंधिचा एक अहवाल आता समोर आला आहे.

आजचं युगे हे इंटरनेटचं युग आहे. आपल्याला आज कोणतेही प्रश्न पडले तरी आपण त्या प्रश्नांची उत्तर गुगलवर सहज शोधतो. आपण आपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये गुगलची मदत घेतो. इंटरनेटमुळे संपूर्ण जग एक प्रकारे जवळ आलं आहे, तसेच कामाची पद्धत सोपी झाली असून, काम करण्याची गती देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कम्युनिकेशन सिस्टम खूप फास्ट झाली आहे. आज आपण जीमेलच्या माध्यमातून बसल्या बसल्या दुसऱ्या देशात राहणाऱ्या व्यक्तींशी देखील सहज संवाद साधू शकतो. प्रत्येक जण आपल्या आवडीच्या गोष्टी गुगलवर सर्च करत असतो. दरम्यान 2025 चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये महिलांनी सर्वाधिक वेळा गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्या? याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आजकाल जवळपास सर्वच महिला या काम करतात. चांगल्या -चांगल्या पदावर नोकरीला आहेत. त्यामुळे दिवसभर त्यांच्याकडे गुगलवर सर्च करण्यासाठी वेळ नसतो. मात्र रात्री झोपताना महिला गुगलवर आपल्या आवडीच्या वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित गोष्टी सर्च करतात. जसं की मेकअप संबंधित टीप्स, मानसिक आरोग्याशी संबंधित टिप्स, वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी सर्च करतात असं हा अहवाल सांगतो. या अहवालानुसार विशेष: मध्यरात्रीनंतर महिलांचं गुगलवर सर्चिंगचं प्रमाण हे दिवसभराच्या तुलनेनं थोडं जास्त वाढतं.
या काळात महिला हेल्थ टिप्स, मेकअप टिप्स, त्याचसोबत वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी, ते पदार्थ कसे तयार करायचे याचा शोध सर्वाधिकवेळा घेतात. तसेच महिलांचा राशी भविष्यावरील विश्वास वाढल्याचं देखील हा अहवाल सांगतो. या अहवालानुसार रात्रीच्यावेळी राशी भविष्य सर्च करण्याचं महिलांचं प्रमाण अलिकडच्या काळात हे 20 ते 25 टक्क्यांनी वाढलं आहे. महिला गुगलवर राशी भविष्यविषयक माहिती देखील वाचतात.
त्याचप्रमाणे या काळात महिला विविध ऑनलाईन विक्री वेबसाईटला देखील भेट देतात. जसं की अॅमझॉन, फ्लिफकार्ड, या साईट्सवरून त्या त्यांना हव्या असलेल्या प्रोडक्टची माहिती घेतात. तसेच अनेकवेळा ऑर्डर देखील करतात, असं या अहवालामधून समोर आलं आहे.
