PM Modi : अशी ही संवेदनशीलता, भर रस्त्यामध्येच मोदींनीच थांबवला ताफा, कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अहमदाबादहून गांधीनगरकडे रवाना होत होता. मोदी दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, मार्गस्थ होत असताना असा प्रसंग घडला की स्वत: मोदींनी आपला ताफा थांबवला..

PM Modi : अशी ही संवेदनशीलता, भर रस्त्यामध्येच मोदींनीच थांबवला ताफा, कारण काय?
पीएम नरेंद्र मोदी यांनी आपला ताफा थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग उपलब्ध करुन दिला
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 3:41 PM

मुंबई : यापूर्वी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा भर रस्त्यामध्ये थांबवावा लागला होता. कृषी विषयक कायद्यांचा निर्णय केंद्राने घेतल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. पण यावळी त्यांनी स्वत: आपला ताफा थांबवल्याची घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला होता. मोदी हे गुजरातच्या (Gujrat) दौऱ्यावर आहेत. अहमदाबादहून ते गांधीनगरला जात असताना हा प्रसंग घडला होता. रुग्णवाहिका पुढे गेल्यावरच त्यांचा ताफाही पुढेही सरकला गेला.

रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्यास प्राधान्य दिले जाते. असे प्रसंग आंदोलना दरम्यान किंवा वाहतुक कोंडीच्या वेळी अनेकवेळा घडले आहे. पण रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देणे किती महत्वाचे असते हे या पंतप्रधानांच्या कृत्यामधून समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदापबादहून गांधीनगरकडे मार्गस्थ होत होते. दरम्यान, पाठीमागून एक रुग्णवाहिके येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच आपला ताफा बाजूला घेऊन थांबण्याचे सांगितले.

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी गांधीनगर-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल देण्यासाठी दाखल झाले होते. त्यांच्या या कृत्याचे कौतुक सोशल मिडियावरही केले जात आहे.

गांधीनगर येथील रेल्वे स्टेशनवरुन त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा तर दाखविलाच पण रेल्वेने प्रवासही केला. गांधीनगर ते अहमदाबाद असा तो प्रवास होता. यावेळी महिला उद्योजक, तरुण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्यासोबत प्रवासात होते.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.