AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बनं उडवण्याची धमकी, पाकिस्तानातून मेल, पोलीस अलर्ट मोडवर

मोठी बातमी समोर येत आहे, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बनं उडवण्याची धमकी, पाकिस्तानातून मेल, पोलीस अलर्ट मोडवर
Narendra Modi StadiumImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 9:00 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला,  या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 25 भारतीय नागरिक तर 1 नेपाळी नागरिकांचा समावेश होता. भारतानं या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील पाच दहशवादी अड्डे भारतानं उद्ध्वस्त केले आहेत, या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा धमकीचा मेल पाकिस्तानातून करण्यात आला आहे, या मेलमध्ये स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे देशातील सर्वात मोठं स्टेडियम आहे, दरम्यान धमकीचा मेल आल्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडमध्ये आले असून, पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त  

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला आहे, मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील चार दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली आहेत, या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र पाकिस्तान उलट्या बोंबा मारत असल्याचं दिसून येत आहे, जिथे एअर स्ट्राईक झाला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानं केला आहे, तसेच आमच्या 26  लोकांचा मृत्यू झाला असून, 46 जण जखमी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.  भारतानं आमच्यावर नुसताच हल्ला नाही केला तर आमची मजाक उडवली आहे, आम्ही लक्षात ठेऊ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये बोलताना दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानला भारतासोबत युद्ध न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.