पीएफआयवर केंद्राचा आणखी एक हातोडा; ‘या’ जागा सील करण्याचे काढले आदेश

पीएफआयवर कडक कारवाई करण्यात आल्यानंतर संघटनेचे ट्विटर अकाउंटही बंद केले गेले आहे. यापूर्वीही संस्थेच्या ट्विटर हँडलवर कारवाई केली गेली होती.

पीएफआयवर केंद्राचा आणखी एक हातोडा; 'या' जागा सील करण्याचे काढले आदेश
महादेव कांबळे

|

Sep 29, 2022 | 9:20 PM

नवी दिल्लीः पीएफआयवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर आता या संघटनेवरची कारवाई आणखी तीव्र झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी दिल्लीतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनची ज्या परिसरात कार्यालय आहेत ती कार्यालयं सील (office seal) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या या कारवाईबरोबरच संस्थेला मिळणारा निधीही गोठवला जाणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून (home Ministry) नमूद केले गेले आहे. ज्या परिसरातील कार्यालयांना सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामध्ये एफ-30/1बी, तळमजला, झैद अपार्टमेंट, रॉयल हॉटेल जवळ, शाहीनबाग, दिल्ली. तर दुसरं ठिकाण आहे, एन-44ए-1, हिलाल हाऊस, तळमजला, अबुल फजल एन्क्लेव्ह, जामिया नगर, दिल्ली. तर तिसरा -3 आहे. बी-27/2, तिसरा मजला, ठोकर नंबर-7, जामिया नगर, दिल्ली या परिसरातील तीनही कार्यालयं सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीएफआयकडून या परिसरांचा वापर या संस्थेची असलेल्या संस्थांच्या वेगवेगळ्या कारवायांसाठी केला जात असल्यानेच त्यांची ही कार्यालयं सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नुकतेच केंद्र सरकारने या संस्थेला बेकायदेशीर संघटना असल्याचेही घोषित केले आहे.

पीएफआयवर कडक कारवाई करण्यात आल्यानंतर संघटनेचे ट्विटर अकाउंटही बंद केले गेले आहे. यापूर्वीही संस्थेच्या ट्विटर हँडलवर कारवाई केली गेली होती.

संघटनेच्या ट्विटर पेजवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कायदेशीरपणे केलेल्या मागणीवरून पीएफआयचे खाते भारतातून बंद करण्यात आले आहे.

या संघटनेव देशातील धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक वातावरण बिघडवल्याचा आरोप केला गेला आहे. या संघटनांमुळेच भारताला मोठा धोका असल्याचेही म्हणण्यात आले आहे.

केंद्र सरकारने दिल्लीतील अनेक ठिकाणी कारवाई केल्यानंतर मंगळुरूमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या संदर्भाता असलेल्या संघटनांची 12 कार्यालयं सील केली गेली आहेत. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, पीएफआयवर बंदी घातल्यापासून, त्यांच्या 10 कार्यालयांबरोबर इतर ठिकाणच्या कार्यालयही बंद करण्यात आली आहेत.

यामध्ये कसाबा बेंगरे, चोक्काबेट्टू, कटिपल्ला, अडूर, किन्नीपाडव, केसी रोड, इनोली, मल्लूर, नेलिकाई रोड आणि कुद्रोली येथील पीएफआय कार्यालयंही सील केली गेली आहेत.

अजीजुद्दीन रोड, बंदर येथील सीएफआय कार्यालय आणि राव आणि राव सर्कल येथीलही कार्यालय सील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें