Mamata Banerjee Detained : धक्कादायक! ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या घराबाहेरच…राजधानीत वातावरण तापलं!

ममता बॅनर्जी यांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टीने तृणमूल काँग्रेस पक्षात हालचाली सुरू होत्या. परंतु आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Mamata Banerjee Detained : धक्कादायक! ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या घराबाहेरच...राजधानीत वातावरण तापलं!
mamata banerjee detained
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 3:03 PM

Mamata Banerjee Detained :  राजधानी दिल्लीमध्ये सध्या वातावरण तापलं आहे. येथे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीतर्फे करण्यात आलेले आहे. म्हणूनच राजधानी दिल्लीत सध्या हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. हे आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी पोलिसांनी विमानातूनच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ताब्यात घेतले आहे. आता या आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे आले आहे. दरम्यान, एकीकडे अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असताना आता दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी तसेच सीआरपीएफने ताब्यात घेतले

ममता बॅनर्जी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ममता बॅनर्जी आजच्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार होत्या. तशी तयारी त्यांनी केली होती. परंतु त्यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच दिल्ली पोलिसांनी तसेच सीआरपीएफने ताब्यात घेतले. ममता बॅनर्जी यांच्यासोबत माजी खासदार साकेत गोखले तसेच तृणमूलच्या अन्य पाच महत्त्वाच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading...

आम्हाला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकले असून…

ममता बॅनर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेताच साकेत गोखले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘ममता दीदी तसेच माझ्यासह पाच लोकांना दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफने ताब्यात घेतलंय. आम्हाला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकले असून अज्ञात स्थळी नेले जात आहे,’ अशी माहिती त्यांनी या पोस्टमध्ये दिलीय. पोलिसांचे हे कृत्य म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा आरोपही केला.

अरविंद केजरीवाल आंदोलनात जाणार

ममता बॅनर्जी यांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टीने तृणमूल काँग्रेस पक्षात हालचाली सुरू होत्या. परंतु आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविदं केजरीवाल, आप पक्षाचे नेते मनिष सिसोदिया तसेच अन्य महत्त्वाचे नेते जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us