AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुमत चाचणीआधीच थलापती विजय यांना सर्वात मोठा धक्का, थेट कोर्टाच्या आदेशाने मोठी खळबळ; आमदाराला…

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचा अलिकडेच शपथविधा पार पडला आहे. मात्र आता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने एका आमदाराला विधानसभा कामकाजात सहभागी होण्यापासून रोखले आहे.

बहुमत चाचणीआधीच थलापती विजय यांना सर्वात मोठा धक्का, थेट कोर्टाच्या आदेशाने मोठी खळबळ; आमदाराला...
TN CM VijayImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 12, 2026 | 7:15 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. थलापती विजय यांचा अलिकडेच शपथविधा पार पडला आहे. मात्र आता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने एका आमदाराला विधानसभा कामकाजात सहभागी होण्यास अंतरिम बंदी घातली आहे. त्यामुळे आता बहुमत चाचणीआधी विजय यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीनिवास सेतुपती असे या आमदाराचे नाव आहे, या आमदाराने तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातून अवघ्या एका मताने विजय मिळवला होता. कोर्टाने ही बंदी का घातली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पेरियाकरुप्पन यांची कोर्टात याचिका

श्रीनिवास सेतुपती यांनी तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातून थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढताना द्रमुक (DMK) चे वरिष्ठ नेते के.आर. पेरियाकरुप्पन यांचा पराभव केला होता. या निकालाची तामिळनाडूसह संपूर्ण देशात चर्चा रंगली होती. यानंतर के.आर. पेरियाकरुप्पन यांनी श्रीनिवास यांच्या एका मताच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पेरियाकरुप्पन यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मतदारसंघातील एक पोस्टल बॅलेट चुकून दुसऱ्या तिरुपत्तूर जिल्ह्यात पाठवण्यात आले आणि तिथे ते अवैध ठरवण्यात आले. याशिवाय EVM मधील आकडे आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीमध्ये 18 मतांचा फरक आढळल्याचाही दावा केला आहे.

एका मताने विजयी

अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास सेतुपती यांना 83,365 मते मिळाली होती, तर माजी मंत्री पेरियाकरुप्पन यांना 83,364 मते मिळाली होती. त्यामुळे सेतुपती यांना एका मताने विजयी घोषित करण्यात आले होते. आपल्या याचिकेत पेरियाकरुप्पन यांनी मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. तसेच श्रीनिवास सेतुपती यांना आमदार म्हणून शपथ घेण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम आदेश देण्याची विनंतीही केली होती.

कोर्टाचा आदेश काय?

पेरियाकरुप्पन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्हिक्टोरिया गौरी आणि एन. सेंथिलकुमार यांच्या खंडपीठाने प्रथमदर्शनी या प्रकरणात गडबड असल्याचे नमूद केले. न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करत सेतुपती यांना पुढील आदेशापर्यंत विधानसभा कामकाजात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता ते विश्वासदर्शक ठराव, अविश्वास प्रस्ताव किंवा कोणत्याही बहुमत चाचणीत मतदान करू शकणार नाहीत. तसेच न्यायालयाने निवडणूक आयोगाला तिरुपत्तूर मतदारसंघातील सर्व कागदपत्रे, CCTV फुटेज आणि फेटाळण्यात आलेले पोस्टल बॅलेट सीलबंद करून सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

टीव्हीकेकडे 120 आमदार

दरम्यान, विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK सरकारला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसांनी बुधवारी विधानसभा बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 234 सदस्यीय तामिळनाडू विधानसभेत सध्या TVK आघाडीकडे 120 आमदार आहेत, तर बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. मात्र सेतुपती यांना मतदानापासून रोखल्यानंतर आघाडीकडे 119 मते असणार आहेत.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह