आज पंतप्रधान मोदी करणार नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन; ‘असे’ असेल आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ

| Updated on: Nov 25, 2021 | 8:37 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता जेवरमध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

आज पंतप्रधान मोदी करणार नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन; असे असेल आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ
पंतप्रधान मोदींनी गैरहजेरीबाबत भाजप खासदारांना सुचक इशारा दिलाय.
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज दुपारी एक वाजता जेवरमध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नोएडा विमानतळ हे दिल्ली एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरी प्रवाशांची संख्या विभागली जाईल.

2024 मध्ये पूर्ण होणार पहिला टप्पा 

विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी 2024 चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विमातळाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात 1050 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी योगी सरकारच्या वतीने 5845 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळाचे पहल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची वार्षीक प्रवाशी क्षमता ही 1.2 कोटी एवढी असणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ असल्याचा दावा

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असल्याचा दावा योगी सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच हे विमानतळ अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असेल, विमानतळाचा परिसर नेहमी प्रदूषमुक्त राहील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती देखील उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या विमानतळावर कार्गो सेंटर बनवण्यात येणार असून त्याची क्षमता 20 लाख मॅट्रीक टन एवढी असणार आहे. विमानतळाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये या कार्गो सेटंरची क्षमता वाढवून ती 80 लाख मॅट्रीक टन एवढी करण्यात येणार आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा

हे विमानतळ जगातील एक प्रमुख आंतराष्ट्रीय विमानतळ असून, विमातळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विमानतळ परिसरामध्ये मेट्रो स्टेशन, रेल्व स्टेशन, बस स्टेशन देखील उभारण्यात येणार आहेत. या परिसरात रुग्णालये व इतर सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विमानतळाला प्रस्तावित असलेल्या वारानसी- दिल्ली हायस्पीड रेल्वेला जोडण्याचे देखील नियोज असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

एक लाख रोजगाराची निर्मिती

याबाबत बोलताना हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, हा केंद्र सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे उत्तप्रदेशात विकासाची गंगा येणार असून, भारताची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे, या प्रोजेक्टमधून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळेल.

संबंधित बातम्या 

ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूलमध्ये, मेघालयात TMC प्रमुख विरोधी पक्ष

Election 2022: भाजप 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान राबवणार

Jammu Kashmir: ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध