काँग्रेसकडून 11 हजार कोटींची नुकसान भरपाई? व्यापारी मैदानात, म्हणाले, ‘आम्हाला भरपाई द्या’

CTI Demand Compensation: चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने दिल्लीतील रामलीला मैदानावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सीटीआयने दिल्ली प्रशासनाला याविषयीचे पत्र लिहिले आहे.

काँग्रेसकडून 11 हजार कोटींची नुकसान भरपाई? व्यापारी मैदानात, म्हणाले, आम्हाला भरपाई द्या
काँग्रेसकडून 11 हजार कोटींची नुकसान भरपाई? व्यापारी मैदानात, म्हणाले, 'आम्हाला भरपाई द्या'
| Updated on: Nov 04, 2026 | 9:17 AM

Congress Agitation on Ramlila Maidan: दिल्लीत या महिन्याच्या सुरुवातीलाच काँग्रेसने मत चोरी, एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला. जंतरमंतरवर बंदी आल्यानंतर सरकारने रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास काँग्रेसला परवानगी दिली. पण काँग्रेसच्या महारॅलीने व्यापाऱ्यांचे 11 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने केला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनावर टिप्पणी केली आहे. आंदोलनाच्या नावावर एखादा मैदानाचा ताबा घेऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. त्याचे सीटीआयने स्वागत केले आहे. त्यातच त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी पत्रव्यवहार केला आहे.

काँग्रेसकडून होणार वसूली?

Loading...

सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे. आता रामलीला मैदानावरील महारॅलीनंतर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. रॅलीचे आयोजकांकडून ही भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी दिल्ली प्रशासनाकडे केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा प्रमाणेच दिल्लीतही भरपाईचा कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीतील रामलीला मैदान आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आयोजीत राजकीय रॅल्या, सभा आणि आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होते. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते असा व्यापारी शिखर परिषदेचा दावा आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या रॅलीमुळे व्यापाऱ्यांचे जवळपास 11 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप करत रॅली आयोजकांकडून त्याची भरपाई देण्याची मागणी केली आहे. यामुळे आता नवीन वाद उफाळला आहे.

व्यापाऱ्यांचे स्वातंत्र्य डावलू नका

लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क आणि अधिकार आहे. पण त्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरणे आणि व्यापाऱ्यांचे स्वातंत्र्य डावलणे योग्य नसल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे. राजकीय पक्ष आणि संघटना मोठ्या संख्येने रॅली घेतात. त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण येतो. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते, अशावेळी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी अशी मागणी सीटीआयने केली आहे. तर यापुढे दिवाळीच्या 10 दिवसात रामलीला मैदान, जंतरमंतर, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट, दिल्ली गेट यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणांना NO Protest Zone जाहीर करण्याची मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना महारॅलीत येत आहात तर थोडीफार खरेदी करण्याचे आवाहन केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us