ट्रान्सजेंडरच्या प्रेमात पडला, लग्न केलं… तिनेच 1 लाख देऊन नको ते केलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एक तरुण ट्रान्सजेंडरच्या प्रेमात असल्याचे समोर आले. दोघांनी लग्न तर केले. मात्र, काही दिवसांमध्येच ट्रान्सजेंडरने नको ते कृत्य केलं. नेमकं काय झालं जाणून घ्या...

ट्रान्सजेंडरच्या प्रेमात पडला, लग्न केलं... तिनेच 1 लाख देऊन नको ते केलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना
transgender
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 08, 2026 | 12:29 PM

प्रेमाला सीमा नसतात असे म्हटले जाते. ते कोणत्याही वयात कोणाशीही होऊ शकते. एक अशीच काळीज पिळटून टाकणारी घटना समोर आली आहे. युवक एका ट्रान्सजेंडरच्या प्रचंड प्रेमात होता. तो ट्रान्सजेंडर म्हणेल ते करायला तयार व्हायचा. शेवटी त्याने त्या ट्रान्सजेंडरशी लग्न केले. पण लग्नाच्या काही दिवसांमध्येच त्या ट्रान्सजेंडरचा खरा चेहरा समोर आला. त्या ट्रान्सजेंडरने पतीची 1 लाख रुपये देऊन सुपारी दिली. जेव्हा या पोलिसांना याबाबत कळाले तेव्हा त्यांच्या पायाखलची जमीनच सरकली. आता नेमकं काय झालं? वाचा…

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घडली. येथे विनोद साह हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या हत्याकांडाची मास्टरमाइंड दुसरी तिसरी कोणी नसून मयताची पत्नी गुंजा ट्रान्सजेंडरच होती. पोलीस तपासात हेही समोर आले आहे की गुंजा ट्रान्सजेंडरने आपल्या प्रेमीच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला आणि यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती.

नेमकं काय घडलं?

घटना 24 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळची आहे. पोलिसांच्या मते, विनोद साहला त्याची पत्नी गुंजा ट्रान्सजेंडरने घरातून आमिष दाखवून किउल नदीच्या काठी नेले. तिथे आधीपासूनच तिचा प्रेमी संतोष कुमार आणि त्याचे तीन साथीदार राज नारायण, मोहम्मद आफताब आणि अजीत कुमार दबा धरून बसले होते. विनोद साह घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी ब्लेडने त्याचा गळा रेतून त्याला गंभीर जखमी केले आणि तिथून पळ काढला.

नदीकाठी जखमी अवस्थेत सापडला होता विनोद साह

कुटुंबीयांनी विनोद साह बेपत्ता झाल्याची माहिती किउल पोलीस स्टेशनला दिली. पोलीस गस्तीदरम्यान रात्री उशिरा किउल नदीकाठी विनोद साहला गंभीर अवस्थेत सापडले. त्याला तात्काळ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गुंजा ट्रान्सजेंडरने स्वतः किउल पोलीस स्टेशनमध्ये वृंदावन गावातील दोन लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्या निर्देशावरून एसडीपीओ शिवम कुमार यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. जेव्हा खटल्याची सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा अनेक धक्कादायक तथ्य समोर आले.

खुनासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती

तपासात समोर आले की गुंजा ट्रान्सजेंडरचे कजरा येथील संतोष कुमार याच्याशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लखीसराय कोर्टात लग्नही केले होते. पती विनोद साह त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता, म्हणून त्याला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला गेला. गुंजा ट्रान्सजेंडरने आपल्या प्रेमी संतोष कुमारला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. कठोर चौकशीदरम्यान गुंजा ट्रान्सजेंडरने गुन्ह्यातील आपली सहभागिता कबूल केली. त्यानंतर पोलिसांनी गुंजा ट्रान्सजेंडर, प्रेमी संतोष कुमार आणि तिघा साथीदारांना अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले दोन ब्लेड, रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी पूर्ण करून त्यांना न्यायिक कोठडीत जेलमध्ये पाठवले आहे.