पठ्ठ्याने नॅनो कारपासून बनवलं हेलिकॉप्टर, हा जुगाड पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी
भारतात जुगाडू लोकांची कमी नाहीये. लोकं आपल्या आवडत्या कामात इतके मग्न होऊन जातात की, त्यांना जे हवंय ते बनवल्याशिवाय ते शांत बसत नाही. असाच एक जुगाड सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Trending News : देशात अनेक जुगाडू लोकं आहेत. जे सतत काही ना काही नवीन करण्यात गुंतलेले असतात.काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच एका युवकाने चक्क नॅनो गाडीला हेलिकॉप्टर बनवले आहे. या गाडीतून प्रवास करताना त्यांना हेलिकॉप्टरचा अनुभव घेत आहेत. हे हेलिकॉप्टर हवेत उडत नसलं तरी तो चर्चेचा विषय बनला आहे.हे हेलिकॉप्टर जेव्हा रस्त्यावर आलं तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहातच राहिले.
आजमगड येथील सलमान नावाचा हा युवक त्याच्या या जुगाडू हेलिकॉप्टरमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 6 सीटर इलेक्ट्रिक सायकलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आजमगडमधील एका तरुणाने ही 6 सीटर इलेक्ट्रिक बाइक तयार केली होती. त्यानंतर आता आझमगडमधील आणखी एका व्यक्तीचा शोध चर्चेचा विषय बनला आहे.
एका तरुणाने रस्त्यावर चालणाऱ्या हेलिकॉप्टरचा शोध लावला आहे.सलमानने भंगारातील काही वस्तूंचा वापर करुन जुगाड केला आहे. त्याने त्याच्या कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर केले आहे.त्याने यामध्ये सुंदर लाइट्स देखील लावल्या आहेत. सलमानने बनवलेल्या या हेलिकॉप्टरची सोशल मीडियावर चर्चा आहे.
हे हेलिकॉर्टर पाहण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत. लोकं गाडीत बसून हेलिकॉप्टर अनुभवत आहेत.त्यामुळे परिसरात याची जोरदार चर्चा आहे.
