Vice President Election : विश्वासात घेतलं नाही म्हणून तृणमूल नाराज; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही

पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले, की पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते 21 जुलैच्या सभेत व्यस्त होते. पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झाली.

Vice President Election : विश्वासात घेतलं नाही म्हणून तृणमूल नाराज; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही
जगदीप धनकर/ममता बॅनर्जी/मार्गारेट अल्वा
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 21, 2022 | 6:15 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तृणमूल काँग्रेस पार्टी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही. गुरुवारी कालीघाट येथील पक्ष कार्यालयात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीएने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना जाहीर केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीसाठी सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मात्र विरोधी पक्षांपासून पूर्णपणे अंतर ठेवून होत्या. दरम्यान, 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Vice President Election) होणार आहे. पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी गुरुवारी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेणार आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर निर्णय घेतला घेणार, असे तृणमूल काँग्रेसने आधीच जाहीर केले होते.

खासदारांच्या बैठकीत निर्णय

पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले, की पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते 21 जुलैच्या सभेत व्यस्त होते. पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत पक्षाचे 33 खासदार उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत सर्व खासदारांनी आपली मते मांडली.

‘विरोधी पक्षाची अवहेलना’

अभिषेक बॅनर्जी यावेळी म्हणाले, की राष्ट्रपतीपदाच्या बाबतीत एनडीएच्या उमेदवाराला कोणत्याही किंमतीत पाठिंबा देणार नाही. दुसरा निर्णय असा की मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणे किंवा मतदानापासून दूर राहणे. उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्षाची अवहेलना झाली, त्यावरून या बैठकीला उपस्थित 85 टक्के खासदारांनी मत मांडले की या निवडणुकीपासून दूर राहायचे.

‘केवळ नातेसंबंधांच्या आधारे समर्थन नाही’

तृणमूल काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. ते किंवा सभापती एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. 85 टक्के प्रतिनिधींनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारच मतदान करतात. म्हणून पक्षाच्या अध्यक्षांनी तो निर्णय खासदारांवर सोडला होता. त्यामुळेच खासदारांच्या मताने हा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांचे मार्गारेट अल्वा यांच्याशी चांगले संबंध आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु केवळ नातेसंबंधांच्या आधारे समर्थन करता येत नाही. ज्या प्रकारे एकतर्फी निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या खासदारांनी यावर आक्षेप घेतला आहे, पण त्यामुळे विरोधी पक्षाच्या ऐक्याला तडा गेला असा होत नाही, असेही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें