उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंनी डाव साधला
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यात निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, निवडणूक आयोगानंं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचे पहायला मिळत आहेत, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील काही जण प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.
राज्यात आधी नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी देखील विविध पक्षांमधून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं होतं. शिवसेना ठाकरे गटातील काही इच्छुकांनी भाजपमध्ये तर काही जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली, महापालिका निवडणुकांपूर्वी आणि त्या काळात देखील अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली. दरम्यान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये देखील हीच परिस्थिती कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महाडमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला असून, ठाकरे गटाचे युवा तालुका प्रमुख प्रफुल्ल धोंडगे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश विकास गोगावले यांच्या ‘लंबोदर’ निवासस्थानी विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला . यावेळी प्रफुल्ल धोंडगे यांनी ठाकरे गटावर टीका करत जोरदार हल्लाबोल केला. ऐन निवडणुकीच्या काळात हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
पक्ष गळती रोखण्याचं आव्हान
दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून ते आता जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरूच आहे, आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून, पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.
