‘त्या’ फोटोवरुन ट्विटरचे सीईओ ट्रोल

नवी दिल्ली : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी मागील आठवड्यात भारतात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसेच देशातील काही महत्वाच्या ठिकाणांनाही भेटी दिल्या. यावेळी डोर्सी यांनी महिला पत्रकारांसोबत एक राउंड टेबल बैठक घेतली, जिथे त्यांनी महिला पत्रकारांसोबत फोटो काढला. त्या फोटोमध्ये जॅक यांच्या हातात ब्राम्हणविरोधी विधान असलेलं पोस्टर होते. त्या […]

त्या फोटोवरुन ट्विटरचे सीईओ ट्रोल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

नवी दिल्ली : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी मागील आठवड्यात भारतात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसेच देशातील काही महत्वाच्या ठिकाणांनाही भेटी दिल्या. यावेळी डोर्सी यांनी महिला पत्रकारांसोबत एक राउंड टेबल बैठक घेतली, जिथे त्यांनी महिला पत्रकारांसोबत फोटो काढला. त्या फोटोमध्ये जॅक यांच्या हातात ब्राम्हणविरोधी विधान असलेलं पोस्टर होते. त्या पोस्टरमुळे डोर्सी यांच्यावर सोशल मीडियावरुन टीका केली जात आहे. हा फोटो अॅन्ना एमएम वेट्टीकॅड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

जॅक यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्यांच्या हातात जे पोस्टर आहे, त्यामध्ये ‘ब्राम्हणवादी पुरुषसत्तेला संपवा’ असा आशय लिहिलेला होता. हा फोटो व्हायरल झाल्यामुळे डोर्सी अडचणीत आले. अनेकांनी डोर्सींच्या फोटोवर टीका केली.

या बैठकीत एक दलित महिला कार्यकर्त्याही सहभागी होत्या, त्यांनी डोर्सी यांना हा फोटो भेट म्हणून दिला. तर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही यूजर्सने डोर्सींना इंटरनेटवर ट्रोल करण्यात आले.

मात्र, पोस्टरवरील विधान हे ट्विटरचे किंवा सीईओ जॅक डोर्सी यांचे नाही, असे ट्विटर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले.

ट्विटर इंडियाने नेमके काय स्पष्टीकरण दिले?