प्रेमापाई वेडेपणा ! दोन्ही भावांचं एकाच मुलीवर प्रेम, परस्पर सहमतीने रेल्वे ट्रॅकसमोर आत्महत्या

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात दोन भावंडांनी चालत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली (two cousins brother fall in love with one girl record video and committed suicide).

प्रेमापाई वेडेपणा !  दोन्ही भावांचं एकाच मुलीवर प्रेम, परस्पर सहमतीने रेल्वे ट्रॅकसमोर आत्महत्या

जयपूर : राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात दोन भावंडांनी चालत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली (two cousins brother fall in love with one girl record video and committed suicide). या दोघी मुलांचं एकाच मुलीवर प्रेम होतं. मात्र, दोघांनी या विषयावर एकमेकांसोबत वाद न घालता परस्पर सहमतीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत स्वेच्छेने आत्महत्या केल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर आपल्या आत्महत्येबाबत कुणालाही दोषी ठरवू नये, असंही त्यांनी म्हटलंय. याशिवाय ज्या मुलीवर त्यांचं प्रेम होतं त्या मुलीचं आवडत्या जोडीदारासोबत लग्न लावून द्यावं, अशी विनंती त्यांनी व्हिडीओत संबंधित मुलीच्या कुटुंबियांना केली आहे. या घटनेची माहिती कळताच परिसरातील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील केशवपूरा गावाच्या दोन चुलत भावांनी रविवारी (7 मार्च) रात्री चालत्या ट्रेनसमोर उडी मारुन स्वत:चं आयुष्य संपवलं. या भावंडांचं नाव महेंद्र गुर्जर आणि देवराज गुर्जर असं आहे. दोघंही 23 वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात दोघंही भाऊ असल्याचं निषपण्ण झालं. या दोन्ही मुलांच्या मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळली नाही. पण पोलिसांनी जेव्हा दोघांचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं (two cousins brother fall in love with one girl record video and committed suicide).

मुलीला जबाबदार ठेवू नये, मुलांची व्हिडीओत विनंती

दोघांच्या मोबाईलमध्ये आशा नावाच्या मुलीचा नंबर सेव्ह होता. दोघांचं या मुलीवर जीवापार प्रेम होतं. त्यांचा मोबाईल तपासल्यानंतर त्या मुलीसाठी त्यांनी जीव दिल्याच्या निष्कर्षावर पोलीस आले. कारण दोघांनी आत्महत्या करण्याआधी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत त्यांनी आपण स्वेच्छेने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. आपण कुणाच्याही दबावात आत्महत्या करत नाहीय, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित मुलीला किंवा त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाला जबाबदार समजू नये. आत्महत्या करण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असंही त्यांनी व्हिडीओत म्हटलंय.

पोलिसांचा तपास सुरु

मुलांनी व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर चालत्या ट्रेनसमोर रेल्वेरुळावर उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस याप्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

हेही वाचा :

VIDEO : गाडी नो पार्किंगला लाऊन पोलिसांशी हुज्जत, महिला SI ने ठोकली कानशिलात

पाच मुलांचा बाप, वय 60 वर्ष, दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांबावर चढून गोंधळ

Published On - 9:40 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI