ओमिक्रॉनचे आणखी दोन नवे लक्षणं आले समोर; ‘हा’ त्रास होत असल्यास तातडीने घ्या डॉक्टरांचा सल्ला

| Updated on: Dec 31, 2021 | 8:47 AM

सर्दी, खोकला, तीव्र डोकेदुखी, ताप, अंगदुखी ही आतापर्यंत ओमिक्रॉनचे काही सामान्य लक्षणे होती. मात्र या लक्षणासोबतच ओमिक्रॉनची आणखी दोन लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

ओमिक्रॉनचे आणखी दोन नवे लक्षणं आले समोर; हा त्रास होत असल्यास तातडीने घ्या डॉक्टरांचा सल्ला
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नव दिल्ली – दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनने भारतामध्ये देखील शिरकाव केला असून, भारतामध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 976 वर पोहोचला आहे. चिंतेची बाब म्हणजे ओमिक्रॉनची आणखी दोन नवे लक्षणं समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने आयसोलेट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे

सर्दी, खोकला, तीव्र डोकंदुखी, ताप, अंगदुखी ही आतापर्यंत ओमिक्रॉनचे काही सामान्य लक्षणे होती. मात्र या लक्षणासोबतच ओमिक्रॉनची आणखी दोन लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार मळमळ होणे आणि भूक न लागणे ही ओमिक्रॉनची आणखी दोन प्रमुख लक्षणे आहेत. वरील लक्षणांसोबतच ही लक्षणे देखील आढळून आल्यास तातडीने आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

त्रास कोणाला होतो

विशेष: ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत आणि त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली, अशा रुग्णांमध्ये मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणे आढळून आल्याचा दावा अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांच्या टीमने केला आहे. सामान्यपणे सर्दी खोकला, डोके दुखी, अंग दुखी ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत. मात्र आता मळमळ आणि भूक न लागणे असे आणखी दोन नवे लक्ष समोर आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

राज्यात निर्बंध

कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचा वेग पहाता मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

बाळ नसल्याने चिंतेत आहात? नवीन वर्षात गुड न्यूज हवी आहे ? मग ज्योतिषशास्त्रातील 5 उपाय करुन पाहा

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट

EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया