बाळ नसल्याने चिंतेत आहात? नवीन वर्षात गुड न्यूज हवी आहे ? मग ज्योतिषशास्त्रातील 5 उपाय करुन पाहा

बाळ नसल्याने चिंतेत आहात? नवीन वर्षात गुड न्यूज हवी आहे ? मग ज्योतिषशास्त्रातील 5 उपाय करुन पाहा
Rashi phal

बाळांचे सुख न मिळण्यामागे ग्रह नक्षत्रही कारणीभूत असू शकतात. जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय तुम्ही नक्की करुन पाहा.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 31, 2021 | 8:39 AM

मुंबई : कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात बाळ ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. पण आजकालची बदललेली जीवनशैली, वय निघून गेल्यावर केलेले लग्न यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना वैद्यकीय आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा मुले मिळण्यास विलंब होतो, तर काही जण संततीसुखापासून वंचित राहतात.

पण काही वेळा बाळांचे सुख न मिळण्यामागे ग्रह नक्षत्रही कारणीभूत असू शकतात. जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय तुम्ही नक्की करुन पाहा.

रूईच्या झाडाची मूळ

लग्नाला बरीच वर्षे उलटूनही बाळ होत नसतील तर मासिक पाळीच्या सातव्या दिवशी रूईच्या झाडाची मूळ घेऊन शिवलिंगावर वाहावे यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते.

चांदीची बासरी

वारंवार गरोदर राहिल्यानंतर काही कारणाने गर्भपाताची स्थिती निर्माण होत असेल तर गर्भधारणेनंतर चांदीची बासरी घेऊन पती-पत्नी दोघांनी मिळून गुरुवारी राधा-कृष्णाला अर्पण करावे. यामुळे मुलावरील अडथळे दूर होतात.

गायची सेवा

जर स्त्रीमध्ये अशी काही कमतरता असेल ज्यामुळे तिला बाळाचे सुख मिळू शकत नसेल तर लाल रंगाची गाय आणि वासराची नियमित सेवा करावी.

काल सर्प योग

काल सर्प योग किंवा पितृदोष यांमुळेही अनेक वेळा संतानसुख प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत कालसर्प दोष दूर करण्यासाठी पती-पत्नी दोघांनी रामेश्वरमला जावून तेथे काल सर्प पूजा करावी. दुसरीकडे पितृदोष असल्यास पिंपळाचे रोप लावून त्याची सेवा करावी.

गोमती चक्र

वारंवार गर्भपाताचा त्रास होत असेल तर शुक्रवारी गोमती चक्र लाल कपड्यात बांधून गर्भवती महिलेच्या कमरेला बांधावे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें