वक्फ बोर्ड विधेयकाला युबीटीचा विरोध?, शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करुन दिली बाळासाहेबांची आठवण
तेलंगणात वक्फची ७७ हजार एकरहून जास्त जमीन असून केवळ २२००० जमीन विवाद मुक्त आहे. उर्वरित जागेवर सरकारची संपत्ती आहे. केरळात देखील अशाच प्रकारचा विरोध केवळ आपली पापे लपविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केला आहे.

लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयक 2025 वर खडाजंगी चर्चा सुरु आहे. या चर्चे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकावर बोलताना कश्मीरात कलम ३७० आणले तेव्हा आम्ही पाठींबा दिला होता. परंतू आज कश्मीरात किती लोकांनी जमीनी विकत घेतल्या आणि कोणाला त्याचा फायदा होणार आहे असा सवाल केला. आज हिंदू देवस्थानांच्या जमीनी विकल्या जात आहेत. त्या रोखणारा कायदा आणला का ? असा सवालही अरविंद सावंत यांनी केला.
लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयक 2025 मांडले गेले आहे. या विधेयकांवर जोरदार चर्चा सुरु आहे. याप्रसंगी चर्चा सुरु असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयका मागचा सरकारचा हेतू चांगला दिसत नसल्याचा आरोप केला आहे. या वक्फ बोर्डावर आता कलेक्टर आदी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्यामागे या जमीनी कोणाला देणार हे स्पष्ट झाले आहे. मणिपूरमधल्या जमीन कोणत्या उद्योजकाच्या घशात घालण्यासाठी वातावरण पेटवत ठेवले आहे हे लोकांना कळत नाही का असा आरोपही खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की,’ जहा दील मे सफाई रहती है, ओठो पे सच्चाई रहती है, हम इस देश के वासी है जिस देश में गंगा रहती है, पर गंगा मैली हो गयी है. हजार लोक मर गए असे सावंत म्हणाले. आधी बटोंगे तो कटोंगे केले, आणि आता मुसलमानांसाठी सौगात आणली जात आहे अशी टीकाही खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
किरेन रिजिजू यांचा सावंत यांना टोला
खासदार अरविंद सावंत हे आपले भाषण संपवून खाली बसत असताना केंद्रिय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की पहिले तुम्ही शिवसेनेत होता. तेव्हाची तुमची भाषा आता काँग्रेससोबत गेल्यानंतरची भाषा बदलली आहे. तुम्ही बिलाला पाठींबा दिला की विरोध केला हे कळाले नाही असेही रिजिजू यावेळी म्हणाले.
वक्फ बोर्डाचा निर्णय मुस्लीमांच्या सशक्तीकरणाचा आहे असा सरकार दावा करीत आहे. परंतू सरकाराचा हेतू वेगळा वाटत असून चिंता वाटत आहे. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर नियंत्रणाचा सरकार प्रयत्न करीत आहे असे वाटत आहे. छत्रपती महाराज हे केवळ तलवार चालणारे नव्हते तर लोकशाही मुल्य जपणारे होते.सर्व समाज ,धर्म, पंथ, समाजाला शिवरायांनी सोबत घेतले होते. शिवरायांनी सर्व धर्मांना मान दिला, प्रत्येकाला सन्मान दिला. न्याय, करुणा धैर्य विचार दिल्याचे खासदार निलेश लंके यावेळी म्हणाले.
आता यांना हिंदूची पण एलर्जी आहे का
आज बाळासाहेबांच्या अंतरआत्म्याला काय वाटत असेल की आज युबीटीवाले कोणाच्या विचारधारेला मानत आहेत. युबीटीचा डिसेन्ट नोट पढके यातना होती है. वक्फ बोर्डावर नॉन मुस्लीम मेंबर नको असे युबीटीवाले बोलत आहे, म्हणजे आता यांना हिंदूची पण एलर्जी आहे का असा सवाल यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. वक्फ बोर्डाचे विधेयक मुस्लीमांच्या भल्यासाठी आहे. परंतू युबीटीवाले आता छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ केला त्या औरंगजेबची बाजू घेत आहेत.
काँग्रेसने मुस्लीमांना व्होट बँक म्हणूनच वापरले
बाळासाहेब ठाकरे यांनी जर मी पंतप्रधान असतो तर कश्मीरचे ३७० कलम हटवले असते असे म्हणाले होते. परंतू युबीटीवाले येथे प्रश्न विचारत आहेत. राम मंदिर बनविल्यानंतर काय झाले असाही प्रश्न हे विचारत आहेत अशीही टीका यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली. काँग्रेसने केवळ मुस्लीमांना व्होट बँक म्हणूनच वापरले. वक्फची जमीनीचे घोटाळे केल्याचे शिंदे म्हणाले.
वक्फ बोर्डाकडे ३६ लाख एकर जमीन आहे. या जमीनीवर आता शाळा, कॉलेज, विद्यार्थ्यांसाठी तिचा वापर केला जाणार आहे. वक्फच्या जमीनीतून केवळ १६३ कोटीचा रेव्हेन्यू मिळाला आहे. त्यामुळे तिचा गैरवापर सुरु असल्याचे स्पष्ट असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत आपल्या भाषणात सांगितले. इंडिया एलायन्सचा एकाही मुख्यमंत्र्याने या संदर्भात भूमिका घेतलेली नाही.
विरोध केवळ आपली पापे लपविण्यासाठी
तृणमुल काँग्रेस असो की दिल्लीत काँग्रेसने वक्फ बोर्डाद्वारे भ्रष्टाचार सुरु आहे. आझम खान समाजवादी पार्टीच्या मंत्र्याने उत्तर प्रदेशात वक्फ मंत्री असताना त्यातून संपत्ती जमा केली. आझम खान याच्यावर भ्रष्टाचाराची 50 प्रकरणे पुढे आली होती. दिल्ली इलेक्शन आधी काँग्रेसने वक्फची १२३ स्थिर संपत्ती मुक्त केली. तेलंगणात वक्फची ७७ हजार एकरहून जास्त जमीन असून केवळ २२००० जमीन विवाद मुक्त आहे. उर्वरित जागेवर सरकारची संपत्ती आहे. केरळात देखील अशाच प्रकारचा विरोध केवळ आपली पापे लपविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केला आहे.
