AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताच निघाले होते… अचानक किंकाळ्या आणि आक्रोश… बस पलटून 17 ठार; काहीच…

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रामनगर कघोट परिसरात प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी झाली. या भीषण अपघातात एकूण 17 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. मदतकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसाठी नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

आताच निघाले होते... अचानक किंकाळ्या आणि आक्रोश... बस पलटून 17 ठार; काहीच...
| Updated on: Apr 20, 2026 | 1:10 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर कघोट परिसरात एक बस पलटी झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन या अपघातात एकूण 17 प्रवासी ठार झाले तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस रामनगरहून उधमपूरकडे जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.

अधिकाऱ्याांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजता रामनगर परिसरातील डोंगराळ परिसरात हा भीषण अपघात झाला. थोड्याच वेळा पूर्वी प्रवाशांनी भरलेली बस रामनगरहून निघाली होती. काही अंतर पुढे गेल्यावर बस पलटली. त्यामुळे प्रवाशांचा एकच आक्रोश, रडारड आणि किंकाळ्या सुरू झाल्या. शांत असलेल्या परिसरात अचानक एकच हल्लकल्लोळ माजल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक प्रवासी डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू करून प्रवाशांना बाहेर काढले.

चालकाचं नियंत्रण सुटलं आणि…

ढिगाऱ्याखालून एकूण 17 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 31 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस उधमपूर येथील एका गावाच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पलटली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 17 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.

मोदींकडून दु:ख व्यक्त

दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोदींना मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि आणि जखमींसाठी नुकसान भरपाई देण्याची घो,णा केली आहे. जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे बसचा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाल्याचं ऐकून वेदना झाल्या. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. तसेच जखमी लवकर बरे होतील, ही प्रार्थना करतो. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे, असं मोदी म्हणाले.

Follow Us
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.