World Hindi Day : युनेस्कोच्या वेबसाईटवर भारतातील वारसा स्थळांची माहिती आता दिसणार हिंदी भाषेतही!

UNESCO on World Hindi Day : भारतातील जागतिक वारसा स्थळांचे हिंदी भाषेतही वर्णन केलं जाणार आहे. तसंच हे वर्णत युनेस्कोच्या अधिकृत वेबसाईटवरही प्रकाशित केल जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. युनेस्कनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली असून भारतातील वारसा स्थळांबद्दल हिंदीतून माहिती प्रकाशित करण्याला परवानगी दिली असल्याचम मान्य केलंय.

World Hindi Day : युनेस्कोच्या वेबसाईटवर भारतातील वारसा स्थळांची माहिती आता दिसणार हिंदी भाषेतही!
युनेस्को वेबसाईटवर हिंदी भाषेचा वाजणार डंगा
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 8:37 PM

नवी दिल्ली : जागतिक हिंदी दिनानिमित्त (World Hindi Day) एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. युनेस्कोच्या वेबसाईटवर आता भारतातील वारसा स्थळांची (UNESCO World Heritage Sites) माहिती ही हिंदी भाषेतदी दिली जाणार आहे. ही माहिती नुकतीच युनेस्कोच्या शिष्टमंडळानं जाहीर केली आहे. यामुळे आता हिंदी भाषेतूनही भारतातील वारसा स्थळांबाबत जाणून घेता येता येणं जगभरातील लोकांना शक्य होणार आहे. जागतिक हिंदी दिनानिमित्त  ही घोषणा करत  युनेस्कोनं भारतीयांना सुखद धक्का दिला आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळांचे हिंदी भाषेतही वर्णन केलं जाणार आहे. तसंच हे वर्णत युनेस्कोच्या अधिकृत वेबसाईटवरही प्रकाशित केल जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. युनेस्कनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली असून भारतातील वारसा स्थळांबद्दल हिंदीतून माहिती प्रकाशित करण्याला परवानगी दिली असल्याचम मान्य केलंय. सोमवारी पॅरीसमध्ये याबाबती माहिती युनेस्कोच्या (UNESCO) शिष्टमंडळानं दिली.

काय म्हटलंय युनेस्कोनं आपल्या पत्रात..?

युनेस्कोनं जारी केलेल्या पत्रात हिंदी भाषेतून माहिती प्रकाशित करण्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसंच युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र हे भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असल्याचंही सांगण्यात आलं. हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्याचं मनापासून स्वागत करत असल्याची भूमिका युनेस्कोच्या शिष्टमंडळानं व्यक्त केली आहे.

जागतिक हिंदी दिनानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाकडून एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच त्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षही होत्या. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही सहभाग घेतला होता. हिंदी भाषा आपल्या ज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार करण्यात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

आयटीच्या क्षेत्रात हिंदीच्या वाढत्या वापरासोबतच, तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता वाढतेय. ही गोष्ट हिंदीचं उज्ज्वल भवितव्य दाखवून देते, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. दरम्यान, एस जयशंकर यांनी आपल्या म्हटलंय की, आम्ही सगळे एकत्र येऊन हिंदीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यादृश्टीनं आम्ही सातत्यानं वाटचाल करत असून नवनवे उपक्रम राबवत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

भारतीय भाषा, संस्कृती आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सरकारने परदेशी विद्यापीठांमध्ये 50 पदांची स्थापना केली आहे. त्यापैकी 13 पदे हिंदीच्या प्रसारासाठी करण्यात आली आहेत. जगभरातील एकूण 100 देशांपैकी 670 शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी भाषा शिकविली जाते, असंही मिनाक्षी लेखी यांनी म्टलंय.

इतर महत्त्वाच्या बातम्या –

Lal Bahadur Shastri | मोदींच्या 12 कोटीच्या कारची चर्चाय, तेव्हा 12,000/-ची कार घेताना शास्त्रींनी लोन काढलेलं

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना चाचणीची गरज नाही! केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?

Assembly Elections 2022 : यूपी, गोव्यासह मणिपुरात कमळ कोमेजणार? ओपनिअन पोल भाजपचं टेन्शन वाढवणारा

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.