मोदी यांची ‘अघोषीत आणीबाणी@११’, जयराम रमेश यांच्या टीकेला केंद्रीय मंत्र्यांचे जोरदार उत्तर

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि सत्ताधारी भाजपाचे मंत्री यांनी एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश यांनी मोदी यांच्या कार्यकालाला 'अघोषीत आणीबाणी@11' असे म्हटले आहे. त्यास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

मोदी यांची अघोषीत आणीबाणी@११, जयराम रमेश यांच्या टीकेला केंद्रीय मंत्र्यांचे  जोरदार उत्तर
| Updated on: May 26, 2025 | 8:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकालाला ११ वर्षे झाली आहेत. त्यासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्ट उत्तर म्हणून काँग्रेसचे नेते खासदार जयराम रमेश यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी यास उत्तर देताना काँग्रेसचे नेते खासदार जयराम रमेश यांनी २६ मे ही तारीख “अघोषीत आणीबाणी @ ११” असे ट्वीट केले आहे. त्यास भाजपाचे केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी जोरदार पलटवार करीत खरमरीत उत्तर दिले आहे.

केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यात ते म्हणाले की  ही मोठी विडंबना आहे की एक कुटुंबाद्वारे संचालित पार्टी आता लोकशाहीच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता करीत आहे. परंतू त्यांनी ही खालील स्वत:ची कृत्ये पाहावीत असे म्हणत जोशी यांनी काँग्रेसच्या आणीबाणीचा पाढा वाचत खालील चार उदाहरणे दिली आहेत.

1. ही तिच कांग्रेस पार्टी आहे जिने देशभरात लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडण्यासाठी शंभरहून अधिक वेळा घटनेचे कलम ३५६ चा गैरवापर केला आहे.

2. १९७५ मध्ये, व्यक्तिगत आणि राजकीय लाभासाठी राष्ट्रीय इमर्जन्सीची घोषणा केली – मुलभूत अधिकारांचे खच्चीकरण केले आणि नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावले.

3. कर्नाटकात यांच्या स्वत:च्या सरकारने एक गॅग ऑर्डर जारी करीत माध्यमांवर बंदी आणली आहे आणि इमर्जन्सीच्या काळाची आठवण करुन दिली.

4.आणि आता काँग्रेस त्यांच्या पक्षावर टीका करणाऱ्या स्वतंत्र विचार व्यक्त करणाऱ्या पत्रकार आणि न्यूज अँकरना निशाना बनवत आहेत आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

येथे पाहा पोस्ट –

अघोषीत आणीबाणी

“काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करणार का?” असा सवाल केंद्रीय मंत्री भाजपाचे नेते प्रल्हाद जोशी यांनी केला आहे.