UP Elections 2022: सहा निलंबित बसपा आमदारांचा सपामध्ये प्रवेश, अखिलेशने केले स्वागत

| Updated on: Dec 24, 2021 | 3:03 PM

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर बहुजन समाज पक्षला (बसपा) मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी आज शनिवारी समाजवादी पक्ष (सपा) मध्ये प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांनी सहा आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले. हे आमदार बराच काळ अखिलेश यांच्या संपर्कात होते.

UP Elections 2022: सहा निलंबित बसपा आमदारांचा सपामध्ये प्रवेश, अखिलेशने केले स्वागत
Follow us on

लखनौः उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर बहुजन समाज पक्षला (बसपा) मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी आज शनिवारी समाजवादी पक्ष (सपा) मध्ये प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांनी सहा आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले. हे आमदार बराच काळ अखिलेश यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी भाजपच्या एका आमदारानेही सपाचे सदस्यत्व घेतले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सपा हा भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभा आहे आणि मजबूत होताना दिसत आहे. (up elections 2022 6 bsp suspended mla join sp akhilesh yadav)

सहा आमदारांना निलंबित होते

बसपाच्या सुप्रिमो मायावतींनी आधीच या सहा आमदारांना निलंबित केले होते जेव्हे त्यांनी राज्यसभा निवडणुकीत सपाची बाजू घेतली होती. या बंडखोरीनंतर बसपाच्या सहा आमदारांना निलंबित केले गेले होते.

या सहा आमदारांची नावं आहेत- सुषमा पटेल मुंगरा (बादशाहपूर जौनपूर), हरगोविंद भार्गव सिधौली (सीतापूर), अस्लम चौधरी धौलाना (हापूर), अस्लम रैनी (श्रावस्ती), हकीम लाल बिंद (हंडिया प्रयागराज), मुजतबा सिद्दीकी (प्रतापपूर प्रयागराज). भाजपचे आमदार राकेश राठोडने देखील सपामध्ये प्रवेश घेतला.

“भाजपने शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही”

अखिलेश यादव यांनी बसपा आणि भाजपच्या आमदारांचे सपा कार्यालयात स्वागत केले आणि त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपामध्ये येऊ इच्छिणारे अनेक लोक आहेत. निवडणुका येईपर्यंत भाजप हे ‘रनिंग फॅमिली’ राहील. या निवडणुकीत भाजपचा सफाया होण्याची खात्री आहे. त्यांनी भाजपचा जाहीरनामा वाचून दाखवला की, भाजपने शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ना त्याचे उत्पन्न दुप्पट झाले, ना त्याचे जीवन सुधारण्याचे प्रयत्न झाले, असं अखिलेश यांनी यूपीच्या भाजप सरकारवर टिका केली.

अखिलेश म्हणाले की, सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. भाजपचे लोक त्यांच्या जाहीरनाम्याची पानं उलटायला विसरतात. आत्तापर्यंत मुलांना लॅपटॉप आणि टॅबलेट देऊ शकले नाहीत.
त्याचवेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांच्याबद्दल अखिलेश म्हणाले की, त्यांचा आदर केला जाईल आणि तोही आमच्यासोबत असेतील.

उत्तर प्रदेश निवडणूक कधी आहे ?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक नेमकी 2022 च्ये सुरूवातीला होणार आहे. यापूर्वी 2017 साली येथे विधानसभा निवडणूक झाली होती जी भाजपने जिंकली होती. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपला 312, काँग्रेसला 7, सपाला 47, तर बसपाला, 19 जागांवर विजय मिळवता आला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती.

Other news

By Elections 2021: तीन लोकसभा, 30 विधानसभेंच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान; महाराष्ट्रात चुरशीची लढत

Leander Paes: टेनिस स्टार लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

 

up-elections-2022 6 bsp suspended mla join sp akhilesh yadav