AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Elections 2021: तीन लोकसभा, 30 विधानसभेंच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान; महाराष्ट्रात चुरशीची लढत

या पोटनिवडणुका राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण यातून 2022 च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा मतदारांचा कौल कळेल. खासकरून भाजप आणि काँग्रेससाठी काही जागा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

By Elections 2021: तीन लोकसभा, 30 विधानसभेंच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान; महाराष्ट्रात चुरशीची लढत
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 12:21 PM
Share

मुंबईः आज तीन लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान सुरू आहे. तीन लोकसभांच्या जागा दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) या राज्यांमध्या आहे आणि विधानसभेच्या जागा 14 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. हे राज्य आहेत- बंगाल (4 जागा), आसाम (5 जागा), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार आणि मिझोराम. (By Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congress)

मतदान आज सकाळी 7 वाजता सुरू झालय. या पोटनिवडणुकांचे निकाल 2 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.

ही निवडणुक राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वंनवाची

विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण यातून 2022 च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा मतदारांचा कौल कळेल. खासकरून भाजप आणि काँग्रेससाठी काही जागा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

निवडणूक आयोगाने रिक्त जागा भरण्यासाठी या पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 30 (c) अंतर्गत- कलम 30 अन्वये तरतुदींनुसार पोटनिवडणुका घेण्यात येत आहे.

महाविकास आघाडीची लढत

या वर्षी फेब्रुवारीमध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हावेलील एकमेव जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे घटक आहेत. या जागेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर ही महाराष्ट्रातील एकमेव जागा आहे जिथे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. चुरशीची लढत असलेल्या देगलूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह 12 उमेदवार निवडणुकी उभे आहेत.

Other news

Petrol Price Today: इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 121 रुपये, तर डिझेलने 112 रुपयांचा टप्पा ओलांडला

1 नोव्हेंबरपासून ‘या’ सहा गोष्टी बदलणार, सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?

By Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congresBy Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congresss

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.