AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशात ‘महाराष्ट्र पॅटर्न’, मोठा राजकीय उलटफेर, ओवैसी आणि चंद्रशेखर यांची तिसऱ्या आघाडीची घोषणा

उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी 'महाराष्ट्र पॅटर्न'नुसार दलित-मुस्लिम एकवटून 'सामाजिक परिवर्तन मोर्चा'ची घोषणा केली आहे. ही तिसरी आघाडी भाजपला आव्हान देणार असून, 403 जागा लढवणार आहे. यामुळे यूपीच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास आले आहे.

उत्तर प्रदेशात 'महाराष्ट्र पॅटर्न', मोठा राजकीय उलटफेर, ओवैसी आणि चंद्रशेखर यांची तिसऱ्या आघाडीची घोषणा
Chandrashekhar AzadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 1:43 PM
Share

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वीच उत्तर प्रदेशात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आलं आहे. आझाद समाज पार्टी (कांशीराम) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) मध्ये आघाडी झाली आहे. आझाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आझाद आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी दलित-मुस्लिमांना एकत्र आणण्याचा जो प्रयोग केला होता, तोच प्रयोग ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद उत्तर प्रदेशात केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

चंद्रशेखर आझाद आणि असदुद्दीन ओवैसी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली आहे. आमच्या आघाडीचं नाव ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असून आमची आघाडी राज्यात सत्ता परिवर्तन करणार आहे. भाजपला हरवण्यासाठी राज्यात मोठी आघाडी उभारायला हवी होती, पण काही लोकांच्या अहंकारामुळे ते घडू शकलं नाही, असं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसलाही या आघाडीत येण्याचं आमंत्रण दिलं. तसेच ही आघाडी सर्वच्या सर्व 403 जागा लढवणार आहे. चंद्रशेखर आझाद हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

ही तिसरी आघाडी नसून…

ही काही तिसरी आघाडी नाहीये. तर सामाजिक बदल घडवून आणणारी आघाडी आहे. ही आघाडी मजबूत आहे. पुढे आणखी मजबूत होणार आहे. आम्ही जस जसे पुढे जाऊ तस तसे वंचित, बहुजन, पीडीत, शोषित आणि कष्टकरी वर्ग या आघाडीत सामील होतील. जे लोक अत्याचार पीडित आहेत. असह्य आहेत. ज्यांचं शोषण होत आहे, अशा लोकांसाठी ही आघाडी मोठी ताकद बनणार आहे. आम्ही या सर्व लोकांना मुख्य प्रवाहात आणणार आहोत. काही लोकांनी या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याची घोषणा केली होती. ते आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाले. पण वंचित घटक हा नेहमी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून वंचितच राहिला आहे. याच घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले.

भाजपला रोखण्यसाठीच मैदानात

यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी आम्ही सामाजिक परिवर्तन आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यात आम्ही यशस्वी ठरू. आमच्या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार चंद्रशेखर आझाद राहतील. आम्ही सर्वच्या सर्व 403 जागा लढणार आहोत. आम्ही 26 नोव्हेंबर रोजी मोठी रॅली आयोजित करणार आहोत. या रॅलीतूनच उत्तर प्रदेशातील सामाजिक बदलाच्या क्रांतीला सुरुवात होईल. आम्ही भविष्यातील राजकारण करणार आहोत, असं ओवैसी यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र पॅटर्न यशस्वी होणार?

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत ओवैसी यांनी आघाडी केली होती. यावेळी या आघाडीला मोठं यश आलं होतं. छत्रपती संभाजीनगरमधून या आघाडीचा उमेदवार लोकसभेवर निवडून आला होता. राज्यात अनेक ठिकाणी या आघाडीला दलित आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाली होती. त्यामुळे या आघाडीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता. आता उत्तर प्रदेशात ओवैसी हे चंद्रशेखर आझाद यांना घेऊन तीच खेळी करत आहेत. उत्तर प्रदेशात या आघाडीचा सर्वाधिक फटका मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला बसण्याची शक्यता आहे. त्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीलाही या आघाडीचा फटका बसण्याची शक्यता असून या आघाडीमुळे भाजपला फायदाच होणार असल्याचं सांगितलं जातं.

Follow Us
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?