AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीसोबत भांडण टाळण्यासाठी नवऱ्याने खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला पण..शेवटी विधिलिखित होतं

पती-पत्नी मध्ये अनेकदा भांडणं होतात. काहीवेळी भांडणं टाळण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न असतो. हर्षित 31 वर्षांचा होता. त्याचं लग्न 2024 साली झालं होतं. पत्नी सोबत वाद असल्याने मागच्या सहा महिन्यापासून तो स्वतंत्र राहत होता.

पत्नीसोबत भांडण टाळण्यासाठी नवऱ्याने खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला पण..शेवटी विधिलिखित होतं
Centurian Park
| Updated on: Oct 14, 2026 | 3:42 PM
Share

पत्नीसोबत भांडणं टाळायचं होतं, म्हणून एका माणसाने चक्क घराच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण असं करणं त्या व्यक्तीच्या जीवावर बेतलं. या व्यक्तीचा 21 व्या मजल्यावरील खिडकीतून पडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेश ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली. आठवड्याच्या सुरुवातीला ट्रॉपिकल गार्डन सोसायटीतील सेंच्युरीयन पार्कमध्ये ही घटना घडली. हर्षित 31 वर्षांचा होता. हर्षित लवानिया असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचं लग्न 2024 साली झालं होतं. पत्नी सोबत वाद असल्याने मागच्या सहा महिन्यापासून तो स्वतंत्र राहत होता. तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

घटनेच्या दिवशी हर्षितची पत्नी त्याच्या फ्लॅटमध्ये आली. तिने दरवाजा ठोठावला. पण हर्षितला दरवाजा उघडायचा नव्हता. त्याला वाटलं आता पुन्हा हिच्यासोबत नवीन भांडण होईल असं पोलिसांनी सांगितलं. बायकोने त्याला बाहेर बोलावलं. पण हर्षितने बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर तिने दरवाजा ओपन करण्यासाठी सिक्युरिटीला बोलावलं.

सीसीटीव्ही फुटेजचा तपास

त्यावेळी हर्षितने फ्लॅटच्या बाल्कनीमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 21 व्या मजल्यावरुन त्याने खालच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हात निसटला व थेट खाली पडला. हर्षित गंभीर जखमी झाला. कॉम्पलेक्सचे लोक हर्षितला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला. हर्षितच्या कुटुंबानुसार पत्नीसोबत वाद सुरु असल्याने तो मानसिक दबावाखाली होता. अजूनपर्यंत या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पोलीस त्याच्या पत्नीची चौकशी करत आहेत. कॉम्पलेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Follow Us
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...