AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI down : UPI वरुन तुमचं डिजिटल पेमेंट होत नाहीय का? ही बातमी वाचा

UPI down : भारतात डिजिटल मोडद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज सकाळपासून UPI APP वापरणारे हैराण झाले आहेत. कारण त्यांचं पेमेंटच होत नाहीय. G pay, Phone pay आणि Paytm वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतोच आहे. अशावेळी UPI वर अवलंबून असलेल्यांना झटका बसला आहे.

UPI down : UPI वरुन तुमचं डिजिटल पेमेंट होत नाहीय का? ही बातमी वाचा
युपीआय ग्राहकांसाठी मोठी बातमी
| Updated on: Apr 12, 2025 | 1:54 PM
Share

भारतात UPI सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाला आहे. त्यामुळे शनिवार सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करु शकत नाहीयत. अचानक झालेल्या या बिघाडामुळे PhonePe, Google Pay आणि Paytm द्वारे देण्या-घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले आहेत. DownDetector च्या आकड्यांनुसार दुपारपर्यंत जवळपास 1,168 तक्रारी यूपीआय सर्व्हीस बद्दल नोंदवण्यात आल्या आहेत. यात Google Pay वर 96 आणि Paytm वर 23 यूजर्सनी अडचणी येत असल्याची माहिती दिली आहे. यूपीआयकडून या बद्दल अजूनपर्यंत कुठलही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. पण मागच्या काही दिवसात यूपीआय डाऊन होण्याच प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

याआधी 26 मार्चला सुद्धा यूपीआय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्निकल बिघाड झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या UPI APPS वरुन जवळपास 2 ते 3 तास ट्रांजॅक्शन करता आलं नव्हतं. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया या समस्येच कारण टेक्निक्ल प्रॉब्लेम असल्याच सांगितलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य यूजर्स आणि व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये अडचण आली होती.

अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे?

सध्या भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. कॅशचा वापर कमी होऊन UPI वरील अवलंबित्व वाढलं आहे. अशा स्थितीत एखाद्या दुकानात वस्तू विकत घेतल्यानंतर पेमेंट होत नसेल, UPI डाऊन दाखवत असेल तर ग्राहकाला मोठा झटका बसतो. कराण डिजिटल पेमेंट होईल म्हणून बँकेच्या एटीएममधून कॅश काढलेली नसते. अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो.

डाऊन होण्याचं कारण काय?

सध्या UPI कशामुळे डाऊन आहे, ते नेमकं कारण NPCI ने सांगितलेलं नाही. पण लाखोंचे व्यवहार यामुळे ठप्प होऊन बसले आहेत. भारतात जी पे, फोन पे आणि पेटीएम वरुन पेमेंट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लाखो रुपयांच्या वस्तूपासून ते पाच-दहा रुपयापर्यंतच्या वस्तुसाठी डिजिटल पेमेंट केलं जातं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.