अनेकदा तोंडावर आपटूनही अमेरिकेची कुरघोडी सुरूच, आता पुन्हा एकदा भारताबाबत खळबळजनक दावा

अमेरिकेच्या दबावानंतर देखील भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, आता पुन्हा एकदा अमेरिकेनं भारताबाबत खळबळजनक दावा केला आहे.

अनेकदा तोंडावर आपटूनही अमेरिकेची कुरघोडी सुरूच, आता पुन्हा एकदा भारताबाबत खळबळजनक दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2025 | 5:38 PM

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये म्हणून वारंवार अमेरिकेकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावानंतरही रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला होता, माझं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणं झालं, त्यांनी मला सांगितलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं, मात्र भारताने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणताही संवाद झाला नाही, असं भारत सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मात्र त्यानंतर आता पु्न्हा एका व्हाईट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमधील एका बड्या अधिकाऱ्यान असा दावा केला आहे की, अमेरिका आणि भारतादरम्यान सुरू असलेली व्यापारी कराराबाबतची चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे सरकत आहे, त्यामुळे आता भारताच्या पेट्रोलियम कंपन्यांनी रशियाकडून सुरू असलेली तेलाची खरेदी 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं असा कोणताही निर्णय घेतला नसून कोणत्याही प्रकारची कपात ही रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये भारतानं केलेली नाहीये, त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की वारंवार अमेरिकेकडून अशा प्रकारचे दावे का केले जात आहेत?

दरम्यान एकीकडे अमेरिकेकडून असा दावा केला जात असतानाच आता दुसरीकडे भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापारी डील संदर्भातील प्रक्रियेनं वेग पकडला आहे, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतामध्ये आलं होतं, चीनने अमेरिकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे आता या डीलला अधिक गती येण्याची शक्यता आहे. मात्र भारताकडून अद्यापही रशियाकडून सुरू असलेली तेलाची खरेदी कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, उलट ही तेलाची खरेदी वाढवली जाण्याची शक्यता आहे.