AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगात हाहाकार

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे, दरम्यान आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगात हाहाकार
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 8:06 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही देशांकडून हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. बुधवारी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर भीषण ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेच्या जॉर्डन स्थित सैन्य तळावर देखील इराणकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. 11 जूनला रात्री आम्ही इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान हल्ल्याच्या काही तास आधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही पोष्ट करण्यात आल्यानं जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिका 11 जूनच्या रात्री इराणवर जबरदस्त हल्ला करेल. इराणकडे असलेले एअर क्राफ्ट, मिसाईल, सैन्यदल नौदल, एअर फोर्स, रडार असं सर्व काही नष्ट झालं आहे. त्यामुळे लवकरच आम्ही आता इराणमधील खर्ग आयरलँडचा ताब्यात घेऊ. खर्ग आयरलँडवर ताबा मिळवल्यानंतर तेथील सर्व प्रकारच्या उत्पादनावर आमचं नियंत्रण असेल आम्हीच तेथील कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचे बाजार दर नियंत्रित करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीने आम्ही व्हेनेझुएला ताब्यात घेतलं त्याच पद्धतीने आम्ही आता इराणमधील खर्ग आयरलँड देखील ताब्यात घेऊ, असं देखील ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे इराण देखील अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. बुधवारीच इराणने अमेरिकेच्या 22 सैन्य तळांवर हल्ले केले आहेत. दरम्यान अमेरिकेनं आपली हीच भूमिका कायम ठेवली तर मात्र हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्ध आणखी पेटू शकतं. आधीच मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे. त्यातच आता अमेरिकेनं जर इराणवर हल्ला केला तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. त्यामुळे आज ट्रम्प हे खरच इराणवर हल्ला करणार का? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...