AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस कॉन्स्टेबलचा तडकाफडकी राजीनामा, दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा; सरकारवर गंभीर आरोप

Sher Singh : जंतर-मंतरवरील आंदोलनात उत्तराखंडमधील पोलिस कॉन्स्टेबल शेर सिंह यांनी नोकरी सोडली आहे. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली आहे.

पोलिस कॉन्स्टेबलचा तडकाफडकी राजीनामा, दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा; सरकारवर गंभीर आरोप
Sher Singh Resign news Image Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 6:49 PM
Share

राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात उत्तराखंडमधील पोलिस कॉन्स्टेबल शेर सिंह यांनी नोकरी सोडली आहे. मंचावरून भाषण करताना त्यांनी सरकार आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी आपल्या खांद्यावरील उत्तराखंड पोलिसांचा बॅज काढून अभिजीत दिपके यांच्या हाती दिली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेर सिंह यांनी म्हटले की, मी उत्तराखंड पोलिसांची नोकरी सोडली असून आता आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो आहोत. त्यांनी शहीद भगतसिंग यांचा उल्लेख करत म्हटले, ‘आयुष्य स्वतःच्या बळावर जगायचे असते. क्रांती विचारांतून जन्माला येते. जर आपल्या हक्कांसाठी लढणे बंड असेल, तर आम्ही बंडखोर आहोत.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलकांनी त्यांचे अभिनंदन केले.

जंतर-मंतरवरून सरकारवर टीका

शेर सिंह यांनी उत्तराखंडमधील भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, उत्तराखंडमध्ये पटवारी भरतीची प्रश्नपत्रिका किराणा दुकानात मिळते. त्यांच्या या वक्तव्याचीही आंदोलनादरम्यान मोठी चर्चा झाली. मात्र, उत्तराखंड पोलिसांनी दिलेली माहिती शेर सिंह यांच्या दाव्यांपेक्षा वेगळी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेर सिंह सध्या उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात कार्यरत आहेत. तसेच एका आरोपीकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू आहे.

शेर सिंह यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शेर सिंह यांना यापूर्वीही विविध आरोपांमुळे त्यांना निलंबनाचा सामना करावा लागला होता. विभागीय नोंदींमध्ये त्यांच्याविरोधात यापूर्वीही कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. आता पोलिस अधिकाऱ्यांनी जंतर-मंतरवर बॅज काढण्याची घटना आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांची माहिती पोलिस मुख्यालयाकडे पाठवली आहे. आता शेर सिंह यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

सध्या शेर सिंह यांच्या भाषणाची, बॅज काढण्याच्या घटनेची चर्चा सुरू आहे. एका बाजूला शेर सिंह स्वतः नोकरी सोडून आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचे म्हणणे आहे की ते अद्याप पिथौरागढ येथे कार्यरत असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान
पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने शेतात सोडली गुरं
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध