VIDEO : कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवतानाच ‘त्याला’ आला हार्ट ॲटॅक, कॅमेऱ्यात कैद झाला शेवटचा क्षण

| Updated on: Dec 20, 2023 | 9:18 AM

तो हॉटेलमध्ये घरच्यांसोबत जेवायला गेला, सगळे हसत-खेळत गप्पा मारत होते. मात्र तेवढ्यात असं काही घडलं ज्याने आनंदाचं वातावरण क्षणात बदललं आणि जीवघेणी शांतता पसरली. वाचा सविस्तर

VIDEO : कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवतानाच त्याला आला हार्ट ॲटॅक, कॅमेऱ्यात कैद झाला शेवटचा क्षण
Follow us on

Heart Attack : अभिनेता श्रेयस तळपदे याला गेल्या आठवड्यातच हार्ट ॲटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. तर यापूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेनलाही हार्ट ॲटॅक आला होता. तिनेच सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. गेल्या काही काळात भारतात हार्ट ॲटॅकच्या अनेक केसेस समोर येत आहेत. नाचताना, किंवा जिममध्ये व्यायाम करताना, किंवा अगदी आरामात बसलेले असतानाही लोकांना हार्ट ॲटॅक आल्याच्या अनेक घटना घडल्या.

अशीच एक खळबळजनक आणि तेवढीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवतानाच एका व्यक्तीला हार्ट ॲटॅक आल्याचे त्यात दिसत आहे. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी व्हिडीओ मध्य प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे एका कुटुंबातील काही सदस्य जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. सगळेजण गप्पा मारत होते, जेवायला सुरूवात करणार तोच त्या कुटुंबातील एका इसमाला हार्ट ॲटॅक आला आणि तो समोरच्या टेबलवर कोसळला. कुटुंबातील इतर सदस्य त्याला उठवण्याचा, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते, पण तो माणूस काही शुद्धीवर आला नाही.

 

हार्ट ॲटॅकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्या इसमाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला, तेथे पोहोचण्याआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. खरंतर, मयंक गर्ग नावाचा हा तरुण बल्लभगडहून दिल्ली मेट्रोने ISBT ला जात होता. जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशनजवळ त्याला हार्ट ॲटॅक आला तो खाली कोसळला. यानंतर त्याला मेट्रो स्टेशनच्या बाहेर काढून, मूलचंद रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.