AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 महिला अन् 15 पती… सर्वजण पंजाबमधून पोहोचले इंग्लंडला; त्यानंतर समोर आला भयानक कांड, नेमकं काय घडलं?

संपूर्ण देशात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आता पंजाबमधून फसवणुकीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती इंग्लंडचा व्हिसा काढण्यासाठी गेला होता. मात्र त्याला व्हिसा मिळाला नाही. यानंतर एक धक्कादायक कांड समोर आले आहे.

1 महिला अन् 15 पती... सर्वजण पंजाबमधून पोहोचले इंग्लंडला; त्यानंतर समोर आला भयानक कांड, नेमकं काय घडलं?
visa crime
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 05, 2025 | 6:03 PM
Share

संपूर्ण देशात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आता पंजाबमधून फसवणुकीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती इंग्लंडचा व्हिसा काढण्यासाठी गेला होता. आपली पत्नी इंग्लंड मध्ये राहते असा दावा त्याने केला होता. मात्र त्याला व्हिसा मिळू शकला नाही. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीने ज्या महिलेचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता, त्या महिलेला आधीच 15 पती आहेत. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी असं समजलं की, या महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 15 लोकांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र या महिलेला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती.

समोर आलेल्या माहितीनुसार एका जोडप्याने ही फसवणूक केली होती. पोलिसांनी या आरोपी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. तसेच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्या महिलेला अटक करण्यात आली आहे, मात्र तिचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर या महिलेचा खरा पती पंजाबमधील राजपुरा येथे राहतो अशी माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणाबाबत अधिक चौकशी केली असता इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या एका जोडप्याने या महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून 15 तरुणांना या महिलेले पती म्हणून इंग्लंडला पाठवण्यात आले. यामुळे पीडित महिलेला इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. ही माहिती समजताच पीडितेच्या पतीने राजपुरा पोलिसांकडे आरोपी जोडप्याविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुलासह इंग्लंडला जायचे होते

आलमपूरमधीस भिंदर सिंग यांना इंग्लंडला जायचे होते. पत्नी इंग्लंडमध्ये राहते, त्यामुळे मुलासह इंग्लंडला जाण्याचा निर्णय भिंदर सिंग यांनी घेतला होता. यासाठी भिंदर सिंग यांच्या पत्नीने स्पॉन्सरशिप पाठवली होती. भिंदर सिंग यांनी इंग्लंडला जाण्यासाठी इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या जोडप्याकडे ही फाइल दाखल केली. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडून 5 लाख 90 हजार रुपये घेतले परंतु काही काळानंतर त्यांना इंग्लंडचा व्हिसा देण्यास नकार दिला होता.

प्रशांत आणि रुबी मुख्य आरोपी

या घटनेनंतर भिंदर सिंग यांच्या पत्नीला इंग्लंडमध्ये अटक झाली. त्यावेशी भिंदर सिंग यांना कळले की आरोपींनी त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. तसेच 15 तरुणांना त्यांच्या पत्नीचे पती म्हणून इंग्लंडला पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास केला असता इमिग्रेशन कंपनी ऑपरेटर प्रशांत आणि त्यांची पत्नी रुबी यांनी हे कांड केल्याचे समोर आले. आता पोलिसांनी दोघांविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ