संघ आणि विश्व हिंदू परिषदेची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी; संशयित पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 27, 2022 | 2:46 PM

दिल्लीतील झंडेवालान येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बुधवारी ही घटना घडली असून खुद्द विहिंपनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

संघ आणि विश्व हिंदू परिषदेची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी; संशयित पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

नवी दिल्लीः विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) दिल्लीतील कार्यालयांवर बुधवारी बॉम्बने हल्ला (Bomb Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवारी एका व्यक्तीने विहिंप कार्यालयात घुसून ही धमकी दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी त्याला पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिल्लीतील झंडेवालान येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बुधवारी ही घटना घडली असून खुद्द विहिंपनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

धमकीनंतर कार्यालयात एकच खळबळ

या धमकीनंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली, त्यामुळे या गोष्टीची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या दरम्यान या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

युवक ताब्यात

यावेळी दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले की, ज्या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे, तो वेगवेगळ्या वेळी दोन्ही ठिकाणी पोहचला होता, आणि त्यावेळी त्याने ही कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. यावेळी पोलिसांनी त्याने रेकी केल्याचेही सांगण्यात आले आहे.

आम्हाला सूचना मिळाली आहे

या प्रकरणातील युवक हा पहिल्यांदा युवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहचला. त्यानंतर तो झंडेवाला येथे असणाऱ्या विहिंपच्या कार्यालयात पोहचला, त्यानंतर तो विहिंपचे प्रदेश महामंत्री सुरेंद्र गुप्ता यांना धमकी देण्यात आली. त्यावेळी तेथील सुरेंद्र गुप्ता यांना तो म्हणाला की, तुमची सर्व कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची आम्हाला सूचना मिळाली आहे, त्यामुळे ही कार्यालये आम्ही बॉम्बने उडवणार आहोत. त्यावेळी त्याला विहिंपच्या कार्यालयात कोंडून ठेवून पोलिसांना बोलवण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या चौकशीला सुरूवात केली.

चौकशीनंतर पोलिसांनी खुलासा करावा

संघाचे उच्चपदस्थ अधिकारी येथील आश्रमात असलेल्या संघ कार्यालयामध्येच मुक्काम करतात. तर दुसरीकडे, झंडेवाला येथील विहिंपचे कार्यालय मंदिर परिसर असल्याने येथे हजारो भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे सुदैवाने धमकी देणाऱ्या तरुणाकडे कोणतीही स्फोटके नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी त्या युवकाची चौकशी करुन पोलिसांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी केली आहे.